दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.
1 min read

दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.

Loading

दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.

*धुळे:दोंडाईचा (प्रतिनिधी)दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे सर्व शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वी संजीवन समाधी सोहळा सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची व प्रतिमेची पुजन व आरती सहसचिव श्री राजेंद्र कोंटुरवार व सौ शितलताई कोंटुरवार यांच्या हस्ते करण्यात येऊन संतोषी माता मंदीर गणपती मंदीर आझाद चौक पंचवटी भागातुन निघुन शेवटी मंगलकार्यालयाच्या जागेवर दुपारी १२ वाजेला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालकीची अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी व सौ सुनिता शिंपी सचिव श्री चंद्रकांत कापुरे व सौ. सविताताई कापुरे यांच्या हस्ते आरती करून विर्सजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकर जाधव यांच्या शुभ हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पुजा करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली यावेळी समाजाला मार्गदर्शन करताना समाज अध्यक्ष पांडुरंग शिंपी, प्रा.प्रकाश भांडारकर श्री सुरेश बागुल,श्री हरिदास जगताप, श्री चद्रकांत कापुरे यानी समाजाचे होत असलेल्या नियोजित मंगलकार्यालयाच्या बांधकाम पुर्ण करण्यास आवाहन केले यावेळी ज्या समाज बांधवानी आज देणगी दिली त्या समाज बांधवांच्या सत्कार करण्यात आला यावेळी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंंपी यानी आपल्या तीन वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर करून समाज बांधवांनी आजवर केलेल्या सहकार्याबद्धल आभार व्यक्त केले*
तसेच कल्याण येथील दानशुर व्यक्तिमत्व असलेले, महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख आपले समाज बांधव डॉ.मनिलाल शिंपी ( विभागीय समन्वय अधिकारी,( नोडल ऑफिसर)
आर.एस.पी.कमांन्डर) यांनी लकी ड्राँ करिता ९ पैठणी साड्या, तसेच विद्यार्थी यांनी २५ दप्तर पाठवली होती ती शालेय दप्तर व समाज संस्थेतर्फे सर्टीफिकेट देण्यात आले. तसेच १०६ समाज बांधवांनी लकी ड्रा योजनेत भाग घेऊन कुपन बाॅक्स जमा केले होते आलेले समाज बांधवाचे लहान मुलांच्या हस्ते नऊ लकी भाग्यवान विजेत्या समाज भगिनींचे कुपन काढण्यात आले व बक्षीस पात्र महिलांना येवला पैठणी साड्या दोंडाईचा शिंपी समाज महिला मंडळाचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते देण्यात आल्या.*
तसेच युवा कार्यकर्ते सतिश जाधव यांच्या वाढदिवस आज असल्याने त्यांचा वाढदिवसा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सौ. शितलताई कोंटुरवार, पुरूषोत्तम सोनवणे, पंढरीनाथ चित्ते यांनी अत्यंत सदाबहार असे संताचे गित गाऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष शरद पवार, सचिव चंद्रकांत कापुरे, सहसचिव प्रा.राजेंद्र कोटुंरवार अ.भा. मंध्यवंर्ती संस्थेचे संचालक प्रा. प्रकाश भांडारकर धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल धुळे जिल्हा युवाध्यक्ष विशाल कापडे, हरीदास जगताप, राजेंद्र गवळे, मनोज मेटकर, मधुकर जाधव, तुकाराम जगताप, तुळशीराम जगताप, सुकलाल जगताप, गोवर्धन पवार, श्री अरूण पवार, डाॅ.प्रा कैलास कांपडणे, मा. युवाध्यक्ष सतिश जाधव श्री देवेंद्र गवळे,योगेश बोरसे, महेन्द्र जगताप, सचिन जगताप, दिपक पवार,नरेंद्र जगताप, श्री निलेश चित्ते तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार, सौ पुनमताई सांळुखे, सौ वर्षा खैरनार, सौ रत्ना चित्ते, सौ सुनिता शिंपी, सौ सुरेखा जाधव,सौ हेमलत्ता पवार, यांनी व सर्व समाज बांधवानी विशेष परिश्रम घेतले तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन सहसचिव प्रा. राजेंद्र कोंटुरवार यांनी केले.तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि समाज बंधू भगिनींचे उपाध्यक्ष शरद पवार यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *