अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर  माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
1 min read

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

Loading

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

अमळनेर प्रतिनिधी
माजी आ.श्री.शिरिष दादा चौधरी यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामिण रस्ते व पुलांसाठी सुमारे ८.५० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
मा.आ.शिरिष दादा चौधरी यांनी सुरवाती पासुनच आपल्या मतदारसंघातील रस्ते विकासाकडे लक्ष दिले आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत व आताही त्यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील ग्रामिण रस्ते व पुलांसाठी तब्बल ८.५० कोटी रुपयांचा निधीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे.
सदर मंजुरी बद्दल माजी आ. शिरिषदादा चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडवणीस साहेब, सा. बां. मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीषजी महाजन साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांचे आभार मानले आहेत.

मंजुर कामे व निधी असा
१) मुसळी फाटा धरणगाव अमळनेर शिंदखेडा रस्ता रामा क्र.६ किमी ४६/००० ते ४७/३०० व ४९/३०० ते ५१/००० ची सुधारणा करणे ता. अमळनेर जि.जळगाव (भाग गलवाडे ते भरवस) (३.००कोटी)
२) मुडी प्र डांगरी लोण आर्डी खडके निसर्डी लोंढवे शिरुड फापोरे रस्ता प्रजीमा क्र.१२७ किमी १०/४५० ते १३/००० ची मजबुती करणासह सुधारणा करणे ता. अमळनेर जि.जळगाव (लोण ते वावडे) (२.५० कोटी)
३) बोळे मोंढाळे बहादरपुर फापोरे अमळनेर रस्ता प्रजीमा किमी २३/००० लहान पुलाचे बांधकाम करणे ता.पारोळा जि. जळगाव (आंबापिंप्री गावाजवळ) (२.०० कोटी)
४) मांडळ जवखेडा आनोरे आर्डी पिंपळे मंगरूळ शिरूड कावपिंप्री रस्ता प्रजीमा किमी ११/०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ता. अमळनेर जि.जळगाव (आनोरे गावाजवळ) (१.०० कोटी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *