• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण

Jul 16, 2024

Loading

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण

*देगलूर* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची नांदेड जिल्हा व देगलूर तालूक्याची सभासद पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच देगलूर येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वातंत्र्यचे मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख अॕड.नरसिंगजी सुर्यवंशी तर
लोकस्वातंत्र्य जिल्हाध्यक्ष म्हणून ईश्वर तलवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा.अॕड.सुर्यवंशी यांचे व जिल्हाध्यक्ष नियुक्तीबध्दल तलवारे यांचे उपस्थित सभासद पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पुणे स्वागत केले.

यावेळी देगलूर तालूका अध्यक्ष सुभाष शंकपाळे यांचे मार्गदर्शनाखाली ओळखपत्र वाटप करण्यात आले अध्यक्षिय पत्रकार बांधव नायगाव तालूका अध्यक्ष चंद्रकांत बोयवार, कुरतपल्ली सदस्य शंकर गायकवाड ,भोकर तालूका अध्यक्ष दिंगबर शिंदे,उमरी तालूका अध्यक्ष परमेशवर गोरठकर,जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ गरडे बाजलवाडी नांदेड नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष भिमराव यरनवाड यडूरकर,हाणेगाव सदस्य युनुस आतार ,केदारकुंटा सदस्य गंगाधर शादुल, कोकलगाव,देगलूर सदस्य पिंजारी,देगलूर तालूका प्रसिद्धी प्रमुख कपिल कुरलेवार ,नांदेड जिल्हा सरचिटणीस साईनाथ पिनलवार,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ पवार असे पदाधिकारी उपस्थित होते.यातील बहूतेकांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात येऊन स्वागत करण्यात आले‌.

अॕड. नरसिंग जी सुर्यवंशी यांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सामाजिक आणि पत्रकार कल्याणाची चळवळ मजबूत करण्यासाठी संघटनेच्या उद्देश आणि वाटचालीचा प्रसार करून सभासद संख्या वाढविण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षिय मनोगतातून केले.
या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिल्याबद्दल लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ईश्वर तलवारे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि सभासदांप्रती आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed