्
विद्यार्थ्याला शिक्षणाची आभुषणे मिळुन ज्ञानसागरात पोहता यावे अशी गुणवत्तेवर कष्ट घेणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विदयालय आहे. असा एक उपक्रम नाही की तो ह्या शाळेत पार पडला नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही उत्कृष्ट नाटीका सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले. प्रत्यक्ष शिक्षक भरती नसतांना कमी शिक्षकावर ही शाळा उत्तमोत्तम शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवत आहे. शासनाचा शिक्षण सप्ताह साजरा करण्याचा जी आर आला आणि शाळेने नियोजन करुन शाळेच्या काही तासिकेनंतर शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व गुण दर्शन विकसित करणारा दिवस या अंतर्गत कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेच सास्कृतिक विभाग प्रमुख तथा लेखक, पत्रकार यांनी नाटके, एकपात्री ,गीते ,नृत्य, समुहगीत, व्यंगनाटय, ओव्या, फॅशन शो यासारख्या कार्यक्रमावर भर देत दोन दिवसात आपले सहकारी आर.जी. राठोड, एम. आर. तडवी यांच्या मदतीने योग्य कृती करुन सांस्कृतिक कार्यक्रम कमी काळात अप्रतिम घेऊन दाखविला. यात विविध गीते, नाटीका, एकपात्री, रॅम वाक, ओव्या, नृत्य सादर करण्यात आले. यात शाळेतील मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले. सर्वच वर्गातून एक कार्यक्रम घेऊन सर्व कलाकार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन बक्षिसे दिली. शाळेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब टाक यांनी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात सूत्रसंचालन आर. जी. राठोड यांनी केले तर आभार विकास महाजन यांनी मानले.