• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई – जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन

Jul 26, 2024

Loading

विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई –
जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे तालुक्यात इंग्रजी विषयांमध्ये ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे जाधव क्लासेसचे संचालक विनोद जाधव सर होय..
गेल्या अनेक वर्षापासून इंग्रजीचे क्लासेस चालवत असतांना समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरांचे एक पाऊल पुढे असते. त्यांनी गुणवत्तेशी कधी तळजोड केली नाही.. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाविषयी गोळी निर्माण केली..
कोरोनाच्या संकटात अनेक मुलांचे आई-वडिलांचे दुःखद निधन झाले… अशा अनाथ मुलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता सर निशुल्क त्यांना इंग्रजीचे शिक्षणच नाही तर त्यांना शालेय उपयोगी वस्तू सुद्धा देऊन आपली समाजसेवा व शैक्षणिक सेवा मनोभावे करत असतात..
केवळ वडिलांचे छत्र नाही वा परिस्थितीमुळे कुणी शिक्षणापासून वंचित रहायला नको म्हणुन दरवर्षी सरांचा “जाधव इंग्लिश क्लासेसचा परिवार” अश्या विद्यार्थ्यांना गेल्या 24 वर्षांपासुन शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेत आलेला आहे, दरवर्षी शहर व तालुक्यातील 70 ते 80 विद्यार्थ्यांना (आता संख्या वाढत चाललीय) इ.10 वी ते 12 वी पर्यंत कुठलीही फ़ी न घेता मोफत शिक्षण देत असतात हे तेवढेच अभिनंदनीय आहे…
भावेश मनोहर पाटील.इयत्ता 7 वी गलवाडे ता.अमळनेर वडील : कै.मनोहर रतन पाटील (सेंटिंग काम करायचे) शेती 5 बिघे दोन वर्षांपूर्वीच अपघातात निधन झाले.आई श्रीमती ममता मनोहर पाटील शेत मजुरी यांच्याशी त्यांनी
स्वतः भावेश च्या आजी व आईना बोलाऊन घेतले सर्व विचारपुस केली त्यात कळले कि भावेश चे वडील सेन्टीग काम करायचे आणि 6 जानेवारी 2022 रोजी दोन वर्षांपूर्वीच अपघाताने निधन झाले आहे..हे ऐकल्यावर…
मी ही नेहमीप्रमाणेच त्याच्या आजींना म्हटले कि काळजी करू नका आणि शब्द दिला कि आजपासुन तुमचा नातु माझ्याकडे दरवर्षी अगदी पुढचे 4-5 कुठलीही फी न घेता शिकेल आणि मुलाला मात्र समजावून सांगितले कि मला बदल्यात काहीच नको पण ह्या आई आणि आजी- आजोबांचे दिवस लवकरच पालटशील एवढा जिव तोडून अभ्यास कर ! तो ही हो म्हटला आणि म्हटला कि मला आर्मीत जायचे आहे आणि देश सेवा करायची आहे. भावेश चे स्वप्न मोठे आहे आणि म्हटले कि देशासोबत आईची आणि आजी बाबांची पण सेवा कर आता तुच त्यांचा आधार आहेस असे मी त्याला सांगितले..
आता पर्यंत दरवर्षी असंख्य विद्यार्थ्यांना मोफत अध्ययन (शिक्षण) आणि असंख्य विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई ,हेच माझे सार्थक, हेच माझ्या ह्या 24 वर्षांचे ह्या क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा स्रोत मी समजतो आणि असेच कार्य अजुन पुढचे उर्वरीत आयुष्य अविरतपणे माझ्या हातुन घडो असे जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव सर यांनी बोलतांना सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *