• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रगती महाविद्यालयाचे भानुदास भोईर यांची सोनगीर योगी या चित्रपटात गुरुगोविंद महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत

Jul 26, 2024

Loading

प्रगती महाविद्यालयाचे भानुदास भोईर यांची सोनगीर योगी या चित्रपटात गुरुगोविंद महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
परमहंस श्री. गुरु गोविंद महाराज, आनंदवन संस्थान, सोनगीर-धुळे* यांच्या जीवनचरित्रावर आधारित *प. पू. भागवताचार्य, डॉ. मुकुंदराज महाराज (मठाधिपती, आनंदवन संस्थान, सोनगीर, धुळे.)* यांच्या सकल्पनेतून साकारलेल्या *”सोनगीर योगी”* या चित्रपटाची निर्मिती करण्याचे भाग्य *”स्वराज्य आर्ट प्रॉडक्शन”* या संस्थेला लाभले.
या चित्रपटात प्रगती महाविद्यालयाचे श्री भानुदास भोईर यांची सोनगीर योगी या चित्रपटात गुरुगोविंद महाराज यांच्या प्रमुख भूमिका सादर करण्याचे भाग्य लाभले.
सदर चित्रपटाच्या माध्यमातून *परमहंस श्री. गुरु गोविंद महाराज* यांचे (कालावधी १८६० – १९२०) सुचरित्र दृश्य स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्य घटनेवर आधारित लघुचित्रपट *”आनंदवन संस्थान, सोनगीर” च्या official Youtu.be channel* वर गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त *रविवार दिनांक 21 जुलै 2024* रोजी महाराजांच्या शुभहस्ते तीन भागांमध्ये *(पूर्वांक, मध्यांक आणि उत्तरांक)* प्रदर्शित करीत आहोत.
आनंदवन संस्थान प्रस्तुत,प. पू. डॉ. श्री. मुकुंदराज महाराज
संकल्पनेतून
लघुचित्रपट – “सोनगीर योगी” परमहंस श्री. गुरू गोविंद महाराजयांचे चरित्रावर आधारित व श्री.एकनाथ देसले लिखित,सुभाष नामदेव मुंडे यांनी दिग्दर्शित केलेला भारती सुभाष मुंडे
निर्मित,सहायक प्रमुख – सचिन रतन पाटील / संजय चवरे,तसेच गणेश कृष्णा पाटीलव रोहन सकट यांनी छायांकित केलेला
*देव अहिरराव यांनी लयबध्द संगीत व गायनची साथ देत*
उत्तम कोल्हे यांनी कला दिग्दर्शक म्हणून कार्य केले आहे.
वेषभूषा व स्केच आर्ट
रंगभूषा किरण शिंदे व स्वप्नाली केळजी
निलेश पिसाट यांनी केले आहे. सोनगीरकर योगी या मराठी चित्रपटामध्ये
प्रमुख कलाकार श्री.भानुदास भोईर, यांच्यासह मनोहर खैरनार, सूरज परब, परीस लोखंडे, संजय चवरे, सचिन पाटील, श्याम पवार, रोहन सकट, संदीप रघुनाथ पाटील, किरण कोळी, निरंजन खाडे, कल्पेश डुकरे, राहुल, विनायक बागवे, सिद्धार्थ माने, भूषण पांडे, नितीन पाटील, संतोष भोपी, मंगेश देसले, विजय पाटील, संदेश क्षीरसागर, अभिजित पवार, अक्षय सोनावले, अल्पेश राऊत, बाळू धळपे, संतोष शिंदे, संकेत पाटील, रिची पाटील. या कलाकारांचा समावेश आहे.
स्वप्नाली केळजी, सुप्रिया आचरेकर, शुभांगी पाटील, समीरा मुंडे.
_आनंदवन संस्थान, सोनगीर-धुळे, मानवसेवा हीच खरी सोनगीरकर योगी या मराठी चित्रपटाचा यशस्वी वाटचालीसाठी, प्रमुख कलाकार प्रगती महाविद्यालयाचे लिपिक श्री.भानुदास भोईर यांच्यासह सर्व कलाकारांना, कल्याण तालुका शारीरिक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण इंगळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनी,तसेच प्रगति महाविद्यालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य यांनीही भोईर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*
सद्गुरु दौलत बाबा यांनी परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली….. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉक्टर रवींद्र भोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *