• Wed. Jun 18th, 2025 8:45:23 PM

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील

Jul 29, 2024

Loading

डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न

डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी *के. रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली*
येथे ठाणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्थेद्वारे
डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक
संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळेसाठी माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. माहितीवर्गासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हासंस्थेचे
मा.श्री किरण लहाने , जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट ,
मा.श्रीमती हेमांगी पाटील, जिल्हा संघटन आयुक्त गाईड
सतीश कोल्हे , सहा. जिल्हा आयुक्त स्काऊट
जीवन मटके , लीडर ट्रेनर तथा जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट
श्रीमती जोड्डीन अल्मेडा, लीडर ट्रेनर तथा जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड
विठ्ठल शिरोसे, नाईक जिल्हा कार्यालय ठाणे. उपस्थित होते
सदर माहीती वर्गासाठी प्रमुख उपस्थिती
मा.सौ संगिता पाखले , प्राचार्या.के रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
.अशोक जगताप अध्यक्ष डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था , जगदीश उगले सचिव डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था. डॉ. मनिलाल शिंपी आर एस पी कमांडर,
नरेंद्र राणे सल्लागार स्थानिक संस्था,
गोपाळ सुर्यवंशी सल्लागार स्थानिक संस्था,
राजेंद्र शेटे सल्लागार स्थानिक संस्था ,
एकनाथ चौधरी उपाध्यक्ष स्थानिक संस्था
सौ. मार्कंडेय मॅडम मुख्याध्यापिका ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , स्काऊट मास्टर चंद्रकांत खैरनार ,श्री हरित मेहता. प्रशांत शिरुडे
गाईड कॅप्टन अनुराधा द्विवेदी व डोंबिवलीतील शाळेमधील स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख माहितीवर्गाचे मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे यांचे शब्द सुमनांनी व स्काऊट गाईड क्लप देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. के.रा.कोतकर विद्यालयाचे स्काऊटस् आणि गाईड्स यांनी सरस्वती वंदना गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
त्यानंतर सामूहिक स्काऊट गाईड प्रार्थना घेण्यात आली .उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शकांचा व पाहुण्यांचा डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर माहिती वर्गास सुरुवात करण्यात आली.
या माहिती वर्गात खालील विषय घेण्यात आले. श्रीमती जोड्डीन अल्मेडा मॅडम यांनी स्काऊट , गाईड इतिहास व चळवळ याविषयी संपूर्ण माहिती दिली.
जिल्हा स्काऊट सल्लागार सतीश कोल्हे यांनी स्काऊट गाईड तासिका नियोजन , उपयोगिता व वार्षिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.गाईड जिल्हा संघटक सौ. हेमांगी पाटील यांनी स्काऊट गाईड चे वेगवेगळे प्रशिक्षण त्याचे विविध टप्पे याबाबत मार्गदर्शन केले.
किरण लहाने सर यांनी कब, बुल – बुल , स्काऊट आणि गाईड पथक नोंदणी ,कब,बुलबुल ,स्काऊट आणि गाईड अभ्यासक्रम बाबत सविस्तर माहिती दिली.
जीवन मटके यांनी स्काऊट गाईड च्या वेगळ्या वेगळ्या क्लॅप ची प्रॅक्टिकल माहिती दिली, मनोरंजनात्मक खेळ गाणी घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन कसे करावे विद्यार्थ्याना स्काऊट गाईड विषयाबाबत आवड निर्माण कशी होईल याबाबत मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी स्काऊट गाईड मधिल विविध पुरस्कार याविषयी मार्गदर्शन केले.
माहिती वर्गासाठी डोंबिवलीतील बहुतांशी शिक्षकांनी स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत शिरूडे यांनी केले.
माहिती वर्गानंतर डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.सभेमध्ये वार्षिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली .त्यानंतर वार्षिक कार्यक्रम नियोजन,
शालेय स्तरावरील स्काऊट गाईड कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ आहवाल जिल्हा संस्था, स्थानिक संस्थेला पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेद्वारे आयोजित केलेल्या सेवा प्रकल्प कार्यक्रमासाठी स्काऊट गाईड यांनी सहभाग नोंदवावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
उर्वरित विषय पुढील सभेत घेण्यात येतील याबाबत सांगण्यात आले.ऐनवेळी कोणतेही विषय नसल्यामुळे अध्यक्षांच्या वतीने सभा संपविण्यात आली.
के. रा कोतकर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगिता पाखले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यार्थ्यांनी बनविलेले बुके देऊन सन्मान केला.
आजच्या या महितीवर्गासाठी उपस्थित सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेतर्फे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.व या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेचे सचिव जगदिश उगले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करत आभार व्यक्त केले.

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार* *भद्रावती नगरपरिषदेच्या ११ माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण* *मध्य प्रदेशातील जबलपूरमधील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश*
कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून**
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *