• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माळी समाज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा

Jul 31, 2024

Loading

माळी समाज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा

नांदुरा : स्थानिक श्री संत सावता माळी भवन येथे माळी समाजातील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा . श्री . सुनिलजी सपकाळ होते.तर प्रमुख मार्गदर्शक वक्ता म्हणून आयोजकांनी मला निमंत्रित केले होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मा .श्री . लालाभाऊ इंगळे , मा. श्री . गजाननराव बावस्कार सर,मा . श्री . अनिलभाऊ इंगळे ,मा . श्री . संजयजी घाटे , मा .श्री . श्यामभाऊ राखोंडे ,मा .श्री . ब्रम्हानंदजी चौधरी, मा . श्री . सुभाषभाऊ गवळी , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा .श्री . अरुणजी ताठे , श्री . मा . सौ . प्रतिभाताई भोपळे,मा . सौ . सरिताताई बावस्कार आदी गणमान्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत करिअर संदर्भात व पालकांसोबत सजग पालकत्व या विषयावर संवाद साधला. व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला . कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
दरवर्षी हा कार्यक्रम माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय संमेलनाचे माजी अध्यक्ष स्व . रामेश्वररावजी वावगे साहेब ( नगर अभियंता नांदुरा ) यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत होता. त्यांच्या निधनाने नांदुरा परिसरातील सामाजिक चळवळीमध्ये पोकळी निर्माण झाली . यावेळी साहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा . नितीन सातव सर(अध्यापक ,कोठारी माध्यमिक कन्या शाळा ,नांदुरा )यांनी केले .प्रास्ताविक मा .श्री . संतोष सातव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा .श्री . प्रशांत चोपडे सर यांनी केले . सोहळयामध्ये एकून 75 विद्यार्थी व 6 विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदुरा तालुका माळी कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .
अत्यंत आनंददायी अनुभव ! आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
*-अरविंद शिंगाडे ( शिक्षक / करिअर समुपदेशक ) खामगाव जि बुलढाणा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed