• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

निवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घ्यावी- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Aug 2, 2024

Loading

निवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घ्यावी- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’.दिवस असतो..
कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होते..
सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व सामाजिक कामाला प्राधान्य द्यावे असे देवगाव देवळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील बोलत होते..
व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील,
शरद सोनवणे, राजेंद्र गवते, छगन पाटील, दिलीप सोनवणे,चंद्रकांत साळुंखे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.. कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजू पाटील यांनी केले..
सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद सोनवणे यांच्या सत्कार प्रसंगी गडखांब केंद्रातील अनेक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, अरविंद प्रतापराव सोनवणे
व सौ सोनवणे मँडम यांचा सेवापुर्ती निमित्ताने सहपत्नीक सत्कार अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे मॅडम,केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक खेमचंद पाटील, गडखांब मुख्याध्यापक बोरसे मँडम, देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

*यांनी केला सत्कार…*
यावेळी देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकांनी सहपत्नी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,शिक्षणाविस्तराधिकारी कविता सूर्व, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील व केंद्रातील मुख्याध्यापक व देवगांव देवळी शाळेतील मुख्याध्यापक अशोक अर्जुन मोरे विद्यमान मुख्याध्यापक,शिक्षक राजेंद्र पांडुरंग पाटील,सौ रेखा अरविंद सोनवणे, सौ गायत्री रामेश्वर भदाणे, श्रीमती कल्पना सुरेश साळुंखे, रमेश शांताराम पाटील,
जितेंद्र देविदास शेटे, भाऊसाहेब सोनवणे, दीपक सोनवणे सह शिक्षक वृंद यांनी सत्कार व केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद सोनवणे यांचा सहपत्निक सत्कार केला..

*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी केले प्रयत्न*
यावेळी नगाव गडखांब केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. शाळेचे मुख्याध्यापक अशोक मोरे,व शिक्षक वृंद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले..
सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद सोनवणे यांनी धन्यवाद व्यक्त केले. व नंतर सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed