भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा कलानिकेतन व्यायामशाळेत संपन्न
ठाणे:कल्याण
( मनिलाल शिंपी)
क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रिडा अधिकारी ठाणे आणि कलानिकेतन व्यायाम शाळा कोनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा शनिवार दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी कोनगावचे जागृत देवस्थान,
आराध्यदैवत श्री चेरोबा,शक्तीचे दैवत बजरंगबली,
काळू वस्ताद यांच्या प्रतिमेंचे पूजन आणि आखाडयाचे पूजन आणि
स्पर्धेचे उदघाटन कोनगांवचा सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.नेताराम म्हस्के यांच्या हस्ते ठाणे पालघर आणि नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी,ठाणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष श्री.सुरेशदादा पाटील,दैनिकस्वराज्य तोरणचे संपादक डॉ.किशोर पाटील,ठाणे जिल्हा तालीम संघाचे सचिव श्री.प्रकाश गोंधळी, भिवंडी तालुका क्रीडा केंद्रप्रमुख प्रा.गुणवंत बेळखडे, भिवंडी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष श्री.श्रीधर,भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री..प्रमोद हनुमान पाटील, डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील (SEO) अध्यक्ष- कलानिकेतन मंडळ कोनगांव,
आर एस पी युनिटचे प्रमुख डॉ.मनीलाल शिंपी,सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री.रमेश मुकादम, कलानिकेतन मंडळाचे सचिव श्री.सतिश कुंडलिक म्हात्रे,कलानिकेतन मंडळाचे उपाध्यक्ष हरेश कराळे कलानिकेतन मंडळाचे संघटक श्री.किरण म्हात्रे,सहखजिनदार मुकेश पाटील,चेतन टावरे,जागृत रिपोर्टरचे संपादक श्री.अफसर खान,वस्ताद बारकू कराळे,आंतरराष्ट्रीय धावपट्टू एकनाथ पाटील,गंगाराम पाटील,कोकण केसरी पै.हरेश कराळे,दिपक ठाकरे,दिपक पाटील,शैलेंद्र पाटील सर,सचिन पाटील सर,पुष्कर पाटील,राजू चौधरी,विशाल चौधरी,मधुकर चौधरी,जीवन वाकडे,विजय शेळके आणि कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कलानिकेतन मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच श्री.विकास पाटील,राष्ट्रीय पंच भाग्यश्री भोईर,जयनाथ पाटील,विष्णू पाटील,महेंद्र जाधव,माधवी कुरले,नाना राणे,श्रीराम धोंडल,पंकज कराळे,राजेंद्र पाटील,किसन भोईर,अजय भोईर,डॉ.तपन पाटील,ज्ञानेश्वर बाचेवार यांनी विशेष मेहनत घेऊन कुस्ती स्पर्धा पार पाडली.
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत १४ /१७ /१९ वर्षाखालील मुले,मुली (फ्रीस्टाईल,ग्रीकोरोमन,महिला) १९५ कुस्तीगीरांनी सहभाग घेतला.प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कुस्तीगीरांची निवड नेतिवली,कल्याण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.सर्व विजयी कुस्तीगीरांचे हार्दिक अभिनंदन….!
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर,कुस्तीगीर,पंच,वस्ताद,शिक्षकवृंद, नेहमीच विशेष सहकार्य करणारे श्रीकृष्ण मंडप डेकोरेटर्सचे मालक श्री.शरद पाटील आणि डी जे प्रतिक म्हात्रे यांचे कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील यांनी आभार मानले.