• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा, उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन

Sep 16, 2024

Loading

सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा

उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
गोपाल सुरेश पाटील यांच्यावर चाकु हल्ला करणार्‍या आरोपींनी पोलीसांना कबुली जबाब देतांना सात्रीचे पोलीस पाटील श्री. विनोद शालीग्राम बोरसे यांचे सांगणेवरुन हल्ला केल्याचे नमुद केले आहे. मौजे धरणगांव पोलीस ठाण्यात दि. ०३/०९/२०२४ गु. र.नं. 3२२/२०२४ भा. न्या. सं. कायदा कलम १०९ (१), 8 (७) प्रमाणे गुन्हा दाखल होवुन गुन्हा निष्पन्न झालेला आहे. तसेच पोलीस पाटील हा रक्षक असतो व गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्याच्या हाती आहे. शासनाचा महत्वाचा समजला जाणारा दुवा असुनही त्याने या गुन्हयात हस्तक्षेप करुन एकप्रकारे त्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला आहे.
गावात पोलीस पोटील नसल्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेसह मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असे असुन सात्री गांवाचे पोलीस पाटील विनोद बोरसे हे मागील दिनांक ०3/०९/२०२४ पासुन त्यांचा गुन्हयात सहभाग असल्यामुळे फरार झालेले आहेत. याकारणे गांवात पोलीस पाटील नसल्याने सात्री गावाची जनता व ग्रामस्थ बेवारस झाली आहे. पोलीस पाटीलच गुन्हेगार असल्याने व फरार असल्याने जनतेचा वाली कोण? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
विनोद वोरसे हे पोलीस पाटील पदावर आहेत. पोलीस पोटील हे गावातील प्रमुख व्यक्ती असुन गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही येथील पाटील यांची असते व सध्या गणेशोत्सव व ईद असे सण सुरु असतांना आमचे सात्री गावाचे पोलीस पाटील शासनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता तसेच कोणतीही रजा न टाकता गुन्ह्यात सहभाग असल्यागुळे फरार झालेले आहेत. त्या ठिकाणी नवीन पोलीस पाटीलची नेमणुक करावी व सात्री गावाचे पोलीस पाटील विनोद बोरसे यांचा पदभार काढुन निलंबित करावे अशी विनंती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रशांत रामचंद्र बोरसे सह मनोहर उत्तमराव पाटील , पुनीलाल सखाराम पाटील , विश्वास निंबा पाटील , राजेंद्र भावराव पाटील ,योगराज प्रल्हाद पाटील
प्रमोद काशीनाथ पाटील ,संदिप सुरेश पाटील , मनोहर देविदास पाटील ,अशोक श्रीराम पाटील ,रमेश रामभाऊ पाटील
शालीक पोपट पाटील, संजय मधुकर पाटील , सोपान उदयभान पाटील १४) राजमत्ल भटा पाटील , बालु पोपट पाटील
सुरेश लोटन पाटील , रामचंद्र पोपट पाटील , सुधाकर निंबा पाटील , देविदास दंगल पाटील ,घनश्याम जिजावराव पाटील, भिमराज विक्रम पाटील, वाल्मीक सुदाम पाटील , विश्वास पिंताबर पाटील,भाऊसाहेब रमेश पाटील यांच्या निवेदनात सहया आहेत..

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *