• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री अनिल पाटील यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन

Sep 16, 2024

Loading

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उत्तर प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना रोजगार उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत व विधीमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांसाठी असलेली पत्रकार सन्मान योजनेची रक्‍कम दरमहा २० हजार करण्याबाबत निवेदन डिजीटल मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात देण्यात येत आहेत..

अमळनेर डिजीटल मिडीयाचे अमळनेर तालुकाध्यक्ष ईश्वर रामदास महाजन व सचीव संजय सुर्यवंशी व संघटनेच्या पदाधिकारी ईमेलद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पाठवले आहे….

 

राज्यातील सर्व समाज घटकांसाठी अनेक योजना राबवून इतिहास घडविल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ! लाडक्या बहिणीपासून अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या आहेत. महानगरातील झोपडपट्ट्या उच्चभ्रुवर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला. राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यापेक्षाही व्यापक धोरण युध्दपातळोवर आपण जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २०हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना आधार द्यावा असे
निवेदनात म्हटले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *