महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची अष्टविनायक यात्रा उत्साहात संपन्न’
अष्टविनायकाचा एकात्मिक विकास आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध करणे आवश्यक-
डॉ नीलम गोऱ्हे
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सिद्धटेक,थेऊर आणि रांजणगाव येथील गणपतींचे दर्शन घेतले.याठिकाणी तिन्ही विश्वस्त मंडळाकडून डॉ गोऱ्हे यांचा महावस्त्र आणि श्रींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या भगिनी श्रीमती जेहलम जोशी उपस्थित होत्या.
नीलम गोर्हेंनी महाराष्ट्र राज्यात सुखसमृद्धी लाभो व सरकारची विकासाची संकल्प सिध्दी होवो अशी प्रार्थना अष्टविनायक यात्रेमध्ये गणरायाकडे केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भक्कम सरकार स्थापन झाले आहे गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातही भविष्यात महायुतीचेच सरकार येईल असा आत्मविश्वास डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
अष्टविनायक यात्रेत सारे वातावरण मांगल्याने, उत्साहाने भरलेले होते. गणेश भक्तांच्या उत्साह यात्रेत दिसून येत होता.
श्री सिद्धिविनायक मंदिर,सिद्धटेक येथे
चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांचे प्रतिनिधी यांचेसोबत मंदिर विकास कामासंदर्भात चर्चा झाली, तसेच स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी यांचेकडून तातडीने पोलीस दुरक्षेत्र निर्माण करण्याची मागणी करण्यात आली, शासन स्तरावर निधीची तरतूदीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन डॉ गोऱ्हे यांनी दिले.
श्री चिंतामणी मंदिर, थेऊर येथे विश्वस्त उमेश विद्वांस यांनी ट्रस्टमार्फत मंदिराच्या पायाभूत सुविधांचे शासनाकडे प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर नीलम गोर्हे यांचे मार्फत मंदिर ट्रस्टला खूप सहकार्य मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
*रांजणगाव येथील महागणपती चे दर्शन झाल्यावर, महागणपती ट्रस्टमार्फत डॉ गोऱ्हे यांना श्री. दत्तात्रय पाचुंदकर यांनी सुसज्ज भक्तनिवास, आधुनिक स्वच्छतागृहे,भाविकांकरता रस्ता क्रॉस करण्याकरता सुविधा यासाठी निधी मागण्याकरिता निवेदन दिले. हायवे वर भाविकांच्या सोयींसाठी योग्य असेल तेथे सिग्नल्स बसवता येतील असे परिवहन विंभागाने सांगुन त्याचीही अंमलबजावणी करता येईल असे डॅा.गोर्हे म्हणाल्या*
. शासनाच्या विविध योजनांमधून या मागणीसाठी निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ गोऱ्हे यांनी दिले. यावेळी जिल्हापदाधिकारी बापूसाहेब शिंदे,
शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारी शेठ काळे,
ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई शिंदे,
मीनाताई गवारे, अश्विनीताई जाधव,सीमाताई पवार , आधी पदाधिकारी उपस्थित होते
रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन संपूर्ण अष्टविनायक दर्शन सांगता झाली, यावेळी भाविकांना सुलभ दर्शन व सुखी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायकांचे एकात्मिक विकास आराखडा बनवुन त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत डॉ गोऱ्हे यांनी व्यक्त केले.