• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कडून “वर्षा” या मुख्यमंत्री निवासस्थानी श्री गणेश दर्शनाची आरतीची सेवा

Sep 17, 2024

Loading

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कडून “वर्षा” या मुख्यमंत्री निवासस्थानी श्री गणेश दर्शनाची आरतीची सेवा.

ठाणे: कल्याण महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वर्षाच्या निवासस्थानी दिनांक 16 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी श्रीगणरायाच्या दर्शनाचा व श्री गणेश आरतीच्या व कर्तव्याच्या लाभ घेतला.कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांनी आर एस पी च्या कार्याचे कौतुक व्हावे यासाठी,आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वर्षा निवासस्थानी,ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील आर एस पी अधिकारी शिक्षक यांना श्रीगणेशदर्शन व आरतीसाठी रीतसर परवानगी घेऊन बोलवण्यात आले होते. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट झाली,

आर एस पी युनिट व विषयाची माहिती दिली, या आधीही कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी शिक्षक निस्वार्थ सेवा देत आहेत, याबाबत मुख्यमंत्री महोदय यांना माहिती मिळाली होती, सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक यांना एकत्र पाहून माननिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा निस्वार्थी कार्याचे कौतुक आणि अभिनंदन केले.यावेळी ठाणे ,नवी मुंबई,पालघर नाशिक विभागिय समादेशक श्री.दिलीप स्वामी, व श्री.मनिलाल शिंपी यांच्यासह आर एस पी अधिकारी श्री. सुधीर वराडकर, दत्तात्रय पाटील, श्री. संदीप कोरडे, श्री. विजय भामरे,श्री. योगेश अहिरे,श्री.मंगेश भामरे, श्री.सुभाष जालिंदर गायकवाड,
गोपाळ अरुण दीक्षित,श्री.दत्तात्रय पटवर्धन, श्री.करणसिंह जडेजा, श्री.बाळासाहेब साठे,श्री.शरद बोरसे,संतोष कदम, शिविर सेन पथरिय, डॉ.दिनेश गुप्ता, श्री.ज्योतीराम शिंदे,श्री.अब्दुल बागडे ,श्री.गोपाळ राव,श्री.संतोष रामचंद्र औटी,श्री.स्वप्नील अडूरकर , श्री.पाटील,श्री.दया पाटील,श्री.अशोक गुप्ता
श्री.ओमप्रकाश धनविजय,
श्री.गोकुळ गवळे या सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधूंनी मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यावर विराजमान श्रीगणेशाचे दर्शन घेऊन दुपारचा आरतीचाही लाभ घेतला, सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आर एस पी युनिटला मुख्यमंत्री महोदयांनी भेट व्हावी यासाठी ठाणे येथील उदार आणि दानशूर असे समाजसेवक श्री माणिक पाटील व त्यांचे चिरंजीव श्री.दया पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले व मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन श्री गणेश दर्शनाच्या व आरतीच्या लाभ भेटला तसेच आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट झाली व त्यांनी आर एस पी युनिट ची आपुलकीने विचारपूस केली व आर एस पी युनिटचा कार्याचे अभिनंदन आणि कौतुक केले.हे पाहून सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधूंना खूप अभिमान वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *