• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी बीडचे पत्रकार अनिल वाघमारे यांची नियुक्ती कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर

Sep 22, 2024

Loading

डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी बीडचे पत्रकार अनिल वाघमारे यांची नियुक्ती

कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर

पुणे : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली.. डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पत्रकारांची ‘डिजिटल मिडिया परिषद’ या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.. डिजिटल मिडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे.. त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील ‘माय मराठी 24 तास’ या वाहिनीचे संपादक संतोष उर्फ सनी शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे..इतर पदांच्या नेमणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत .. कार्यकारिणी सदस्य म्हणून माथेरानमधील ‘महाराष्ट्र न्यूज 24 तास’चे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील ‘वास्तव अपडेट’चे संपादक जितेंद्र शिरसाट, ‘डिबीसी न्यूज चंदगड’चे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ, नगर येथील ‘न्यूज टू डे 24’ चे संपादक अल्ताफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. 11 जणांची ही कार्यकारिणी असेल.. उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.. डिजिटल मिडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारित असेल.. ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी अभिनंदन केले आहे…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *