ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
==================
दहा दिवसांच्या आत तत्पर मागण्या पूर्ण करू; प्रधान सचिवांशी बैठकीचे दिले आश्वासन
====================================
*मुंबई : प्रतिनिधी नुकतेच ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाकचे नवी मुंबईतील खारघर सायबर सिटी नवी मुबई येथे राज्य अधिवेशन संपन्न झाले. त्यात सर्वानुमते पारित झालेल्या ठारावतील मागण्या व तत्कालीन परिस्थितीला अनुसरून मागण्यांच्या संबंधाने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांच्या नेतृत्वाखाली घेतली*.
*यावेळी संघटनेच्यावतीने अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांच्या संबंधाने अल्पकालीन, दीर्घकालीन, धोरणात्मक निर्णय व सध्या परिस्थितीला अनुसरून मागण्यांचे पत्र दिले. त्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी भरती रद्द करून ओबीसीसह सर्व प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय पदांचा अनुशेष तात्काळ भरावा, आदिवासी बहुल भागातील पेसा क्षेत्रात येणाऱ्या सर्व शासकीय पदभरतीमध्ये बिगर आदिवासी उमेदवारांना संधी देण्यात यावी, विविध शासकीय, आर्थिक, शैक्षणिक, अर्थसहाय्य व कृषीविषयक योजनांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास उत्पनाचा वेगळा दाखला मागण्यात येऊ नये, मुलींच्या उच्च शिक्षणातील शुल्क फी सवलतीसाठी असलेल्या उत्पनाची मर्यादा काढून सरसकट सर्व मुलींना शुल्क माफी देण्यात यावी, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ओबीसी वसतिगृह सुरू करण्यात यावे, पूर्णवेळ पी.एचडी करणाऱ्या विद्यार्थ्याना महाज्योतीच्या मार्फत देण्यात येणारी अधिछात्रवृत्ती बार्टी प्रमाणे १०० टक्के दराने नोंदणी दिनांकापासून फेलोशिप अदा करावी, ओबीसींना संख्येच्या प्रमाणात व वेगळे बजेट देण्यात यावे, सगेसोयऱ्यांची अधिसुचना तात्काळ रद्द करावी, ओबीसींना पदोन्नतीं आरक्षण लागू करण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह आदी मागण्यांची पूर्तता करण्याची हमी त्यांनी दिली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्यावतीने येत्या दहा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याच्या संबंधाने प्रस्ताव तयार करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी सोमवारी मंत्रालय येथे बैठक लावून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.*
*शिष्टमंडळात संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे, संघटनेचे सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, कोकण विभागीय अध्यक्ष विजय केसरकर, बँकिंग कक्ष महासचिव विजय राहाटे, रेल्वे कक्ष महासचिव औदुंबर सुतार, ओबीसी प्रश्नांचे अभ्यासक मागेश्वर हटवार, सर्व समाज ओबीसी आघाडीचे संयोजक संतोष आंबेकर, ठाणे जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्ते अनिल भोईर, शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रकाश पाटील, ओबीसी उपोषणकर्ते भरत निचिते, नवी मुंबईतील ओबीसी सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार राऊत ज्ञानेश्वर चंदे, व उमेश पाटील रमेश पाटील,औदुंबर सुतार सोलापूर तसेच आणि पदाअधिकारी प्रतिनिधी यांची उपस्थित होती*