पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ: अमळनेर येथील खास कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील स्टेशन रोड,मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या प्रांगणात पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन आज दिनांक २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.
श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न होत असतो.या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा,मिल चाळ,अमळनेर यांचे अनमोल सहकार्य लाभत असते. यावर्षीही भाद्रपद कृ.॥ ८ बुधवार दिनांक २५ सप्टेंबर ते भाद्रपद कृ.॥ १४ मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भागवत कथा ज्ञानयज्ञाचे (पितृ भागवत) आयोजन करण्यात आले आहे. कथाकार म्हणून भागवताचार्य हेमंतदादा पाठक (संस्थापक,हिंदु धर्म संस्कृती रक्षक संघ) यांची उपस्थिती रहाणार आहे. दररोज दुपारी ४ ते ७ या वेळेत स्टेशन रोड अमळनेर येथील धर्मशाळेच्या प्रांगणात होणा-या या कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————-