फरार मुख्य आरोपी महेंद्र बोरसे अन्य आरोपी विनोद बोरसे यालाही अटक व्हावी
अमळनेर पत्रकार परिषदेमध्ये माजी सरपंच सुरेश पाटील यांची मागणी
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरच्या तरुणावर झालेल्या चाकू हल्यातील
मुख्य आरोपी महेंद्र शालिग्राम बोरसे अद्यापही फरार असून या प्रकरणात महेंद्र पाटील यांचा लहान भाऊ विनोद बोरसे पोलीस पाटील सात्री तालुका अमळनेर याच्यावरी पोलीस तपासता आरोप निष्पन्न झाला असेल त्याच्यावरही कलम 109(1) 3(5) नुसार गुन्हा दाखल झाला असून तो देखील फरार आहे.. मात्र या प्रकरणातील
हल्लेखोर सागर खैरनार, विजय देवरे, आणि आकाश उर्फ राघव जाधव या तीन आरोपींना पोलीस अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे..
मागील एका भांडणाच्या कारणावरून गोपाल सुरेश पाटील राहणार सुंदरपट्टी तालुका अमळनेर हा तरुण 17 रोजी जळगाव येथील न्यायालयीन कोठडीतून जामीन सुटका होऊन अमळनेर कडे मोटरसायकल वरून येत असतांना मुसळी गावाच्या पुढे सुमारे 1 किलोमीटर अंतरावर शिवाजीराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्यावर आलेल्या गतिरोधका जवळ अगोदरच उभे असलेल्या सागर खैरनार, विजय देवरे आणि आकाश राघव नंदू जाधव या तिघांनी गोपालवर जीवे ठार
मारण्याच्या उद्देशाने चाक सारख्या हत्याराने डोक्यावर पाठीवर कानावर हल्ला केला ..त्यात गोपाल गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारार्थ धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.. अद्यापही त्याच्यावर उपचार सुरू आहे..
याप्रकरणी गोपालचे मामा किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 17 रोजी धरणगाव पोलिसात महेंद्र बोरसे व अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.. पोलिसांच्या तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ३१ ऑगस्ट रोजी सागर खैरनार ,विजय देवरे आणि आकाश जाधव या तिघांना अटक केली.. पोलिसांनी अधिक तपास केला असता महेंद्र बोरसेचा लहान भाऊ विनोद बोरसे देखील चाकूहल्यातील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले .त्यानुसार विनोद बोरसे यांच्यावर देखील धरणगाव पोलिसात कलम 109 (1) 3 (5) नुसार गुन्हा दाखल झाला आहे मात्र तो देखील फरार झाला असून पोलीस दोन्ही भावाच्या मागावर आहेत…
विनोद बोरसे हा सात्री गावाचा पोलीस पाटील असून गावातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे..
शासनाचा महत्त्वाचा समजला जाणारा दुवा असूनही त्याने या गुन्ह्यात हस्तक्षेप करून एक प्रकारे त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे.. सात्री गाव अगोदरच पुनर्वसनासाठी शासन दरबारात पाठपुरावा करत आहे.. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बोरी नदीला पूर आल्यास सात्री गावाचा संपर्क तालुक्याशी तुटतो..
त्यात गावाचा पोलीस पाटील विनोद बोरसे हा फरार आहे अशा प्रसंगी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहेत..
तरी सुंदर पट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की माझ्या मुलाला न्याय मिळावा.. फरार आरोपीला त्वरित अटक करून पोलीस स्टेशनमध्ये हजर करा असे सांगितले..
यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..