लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला!
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हाधिकारी, जळगांव यांनी ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र शासन, यांचेकडील दिनांक १३ जुन २०२५ रोजीच्या अधिसुचनेव्दारे दिनांक ५ मार्च २०२५ रोजीची अधिसुचना अधिक्रमित करण्यात आलेली असुन प्रस्तुत अधिसुचना मधील अनुसूची २ मध्ये जळगांव जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतींकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या दिनांक ११/०४/२०२५ रोजीच्या आदेशान्वये उपरोक्त प्रवर्गाकरीता तालुकानिहाय वाटप करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण अधिक्रमित करण्यात आलेले असल्याबाबत त्यांचेकडील पत्र क्र. ग्रामपं/ई ऑफीस/२०५३९१५ दि.३०/०६/२०२५ अन्वये आदेशित केलेले आहे.
त्यानुसार, अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षण निश्चित करावयाचे आहे. जळगांव जिल्ह्यातील तालुका निहाय सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी तालुकानिहाय सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यासाठी, मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ चे नियम २अ (४) अन्वये जिल्हाधिकारी यांनी सभा घेणे आवश्यक आहे. यास्तव मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केलेले आहेत.
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची सभा नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि.०८/०७/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच उपरोक्त प्रमाणे निश्चित केलेल्या सरपंच पदामधून, महिलांसाठी आरक्षण (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) राखुन ठेवण्याची कार्यवाही मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि.०८/०७/२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर आरक्षण सोडतीस अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
अमळनेर तालुक्यातील, सर्व जनतेस तसेच सर्व पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांना या निवेदनाद्वारे जाहीर विनंती करण्यात येते की, अमळनेर तालुक्यातील एकुण 119 ग्रामपंचायती मधुन सन 2025-2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत खालील प्रमाणे दिनांक. 08/07/2025 नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दुपारी 2.00 वाजता आयोजीत केलेली आहे. तरी सदरील आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे. ही विंनती.
प्रवर्गनिहाय आरक्षण तपशील अमळनेर ग्रामपंचायत संख्या एकूण 119 तर अनुसूचित जाती 6 तर अनुसूचित महीलासाठी 3
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे
14 तर अनुसूचित महीलासाठी 7 आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ना.मा.प्र
32 तर महीलासाठी 16 तर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे सर्वसाधारण साठी 67 व सर्वसाधारण महिलासाठी 34 आहेत. असे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी एका पत्रकार सांगितले.