• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माध्यमिक विद्यालय शिंदी या शाळेमध्ये आज वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा*

Jul 4, 2025

Loading

*माध्यमिक विद्यालय शिंदी या शाळेमध्ये आज वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा*

शिंदी प्रतिनिधी(पक्षिमित्र अश्विन पाटील)
*कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी* या शाळेमध्ये *आज 04 जुलै रोजी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी हा कार्यक्रम उत्साहात* संपन्न झाला.पालखी सजवून त्याच्यामध्ये वृक्ष व ग्रंथ ठेवण्यात आले. तदनंतर विद्यालयाचे *मुख्याध्यापक जिभाऊ सो. श्री.एस.एस.पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.डी.पाटील सर यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर ही वृक्षदिंडी वाजत गाजत संपूर्ण गावातून प्रचार व प्रसार करण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगाचे गायन करत करत पांडुरंगाचे नामस्मरण घेत घेत संपूर्ण गावातून काढण्यात आली* या पालखीच्या *मिरवणुकीत गावातून घरोघरी पालखीचे औक्षण करण्यात आले. इ.पाचवी ते दहावी च्या निवडक मुलींनी डोक्यावर कळस घेऊन तर ईतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेवून या दिंडीची शोभा वाढवून कार्यक्रमाचा उत्साहात वाढवला*
त्यानंतर शालेय प्रांगणामध्ये शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,
विद्यार्थी यांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
अशा पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे *मुख्याध्यापक जिभाऊसो.श्री. एस.एस.पाटील सर* यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी शिंदी येथील येथील *जय गणेश भजनी मंडळाचे संचालक श्री सावता माळी* यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *