आढावे परिवाराकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्ठान्न पदार्थाचे वाटप
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव चे तंत्रस्नेही शिक्षक एस.व्ही. आढावे यांचे वडील बापूसो. विजय आढावे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने दि. ४ जुलै, २०२५ शुक्रवार रोजी महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि मिष्ठान्न पदार्थांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे, एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, एच डी माळी, व्ही टी माळी, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, अशोक पाटील व जीवन भोई उपस्थित होते.