• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉ.अंजली चौधरी व डॉ.विवेक चौधरी यांचा सत्कार* [ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे शहरातील डॉक्टरांचे हृद्य सत्कार ]

Jul 4, 2025

Loading

*राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉ.अंजली चौधरी व डॉ.विवेक चौधरी यांचा सत्कार*
[ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे शहरातील डॉक्टरांचे हृद्य सत्कार ]
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२५ रोजी भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अंजली चौधरी यांना शाल , श्रीफळ व पुस्तक देऊन केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड आप्पा यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. हृदयरोग तज्ञ डॉक्टर विवेक चौधरी यांचा सत्कार निवृत्त प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वाय.एन. ठोसरे यांनी केला.प्रारंभी भारतरत्न डॉ.बी.रॉय यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मार्गदर्शनात गायकवाड आप्पा म्हणाले की , ‘ डॉक्टर रुग्णसेवा ईश्वर पूजा मानतात.नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणून डॉक्टर हे पृथ्वीवरील ईश्वरा समान आहेत या श्रद्धेतून व सामाजिक उत्तरदायित्वातून श्रद्धापूर्वक डॉक्टरांच्या रुग्णांप्रती समर्पण भावना व अथक प्रयत्नांच्या अमूल्य योगदानाचा कृतज्ञतेने सत्कार करणे समाजाचे कर्तव्य आहे.या विशुद्ध भावनेपोटी ५ वर्षापासून पुस्तक भिशी डॉक्टरांचा सत्कार करीत असते.’ ठोसरे साहेब यांनी मनोगतात कोरोना काळात डॉक्टरांनी दाखविलेले धाडस व त्यागाचे दाखले देत रुग्णांना जीवदान देणाऱ्या अतुलनीय व्यवसायनिष्ठेबद्दल चौधरी दाम्पत्यांचे विशेष कौतुक केले.सत्काराचे आयोजक तथा पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी सत्कार स्विकारल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले.
शहरातील मान्यवर डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी ( एम.डी.पॅथॉलॉजी ), डॉ. नंदाजी जैन ( स्रीरोग तज्ञ ), डॉ.प्रथमेश जैन ( स्रीरोग तज्ञ आणि सर्जन ) यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला.याप्रसंगी रुक्मिणी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज जैन व तंत्रज्ञ गणेश शिंपी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी या वर्षाच्या डॉक्टर दिनाची थीम ” Behind the Mask : Who heals The Healers ” सांगून सांगोपांग चर्चा करीत तारा लॅबोरटरीच्या सुसज्ज यंत्रणांची व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
डॉ.आर.एस डाकलिया ( संस्थापक , मानवसेवा मंडळ ), नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.पवन चांडक व डॉ.सविता चांडक यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला. नेत्रतज्ज्ञ श्रुती चांडक यांचा सत्कार मुक्त पत्रकार मंजुषा पवनीकर व डॉ.पियुष चांडक यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते पंकज पवनीकर यांनी केला.डॉ.चांडक दाम्पत्याचा लुल्हे यांनी आशिर्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *