“संवाद, सहकार्य आणि शिक्षणासाठी नवे पर्व – झांबरे विद्यालयात पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न”
पालक-शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची उत्साहात निवड
अमळनेर प्रतिनिधी
के.सी. ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या कार्यकारीणीच्या पहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत 2025- 26 या शैक्षणिक वर्षात पालक -शिक्षक संघाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष श्री सुधाकर सोनवणे, सचिव सौ.प्रियंका फेगडे, शिक्षक सचिव आर एन तडवी व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भूमिका गोपाळ चौधरी या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाच्या प्रमुख प्रतिभा लोहार यांनी केले. सदर सभेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून ते अभ्यास, विद्यार्थी सुरक्षा,शिस्त, वर्षभर घेण्यात येणारे उपक्रम , अभ्यासाचे नियोजन व पालक -शिक्षक संघातर्फे तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी केले सदर सभेत निवडून आलेले सर्व पालक शिक्षक संघाचे कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे :-
दिपक पाटील, संगीता बावस्कर, शर्मिला भामरे , शितल पोतदार, सेजल चौधरी ,योगिता सपकाळे, सुरेखा पाटील, दिपक सूर्यवंशी, सविता विसपुते ,भाग्यश्री साळुंखे ,सुरेखा महाजन ,वैशाली गुरव ,संगीता सोनार, सोनाली दाभाडे ,प्रियंका फेगडे ,पवन सोनवणे ,तुकाराम चौधरी, संदीप देशमुख ,कुंदन महाजन, प्रवीण वाघरी, देवेश पाटील व सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले