• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ

Jul 3, 2025

Loading

आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ

जळगाव :- आषाढ पौर्णिमा हा दिवस सर्वत्र गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो याला कारण म्हणजे याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांनी पाच तपस्वी लोकांसमोर आपले पहिले प्रवचन दिले व या प्रवचनाने प्रभावित होऊन हे पाच तपस्वी त्यांना शरण गेले. त्यांनी गौतम बुद्ध यांना आपला गुरु मानले . या प्रसंगा मुळे गौतम बुद्ध जगातील पाहिले गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले .
दुसरे असे याच दिवशी याच प्रसंगा मुळे भगवान बुध्द यांनी बौद्ध धम्माची व भिक्खू संघाची स्थापना सारनाथ येथे केली . इथूनच बौद्ध धम्म प्रचार , प्रसार सुरू झाला . त्यामुळे हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो तेंव्हा आषाढ पौर्णिमा ( या वर्षी हा दिवस १० जुलै रोजी आहे ) हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी एका पत्रकान्वये केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *