*साने गुरुजी विद्यालयात वाचन साहित्य संकलन*
माझी शाळा, माझा वर्ग, माझी जबाबदारी अंतर्गत उपक्रम पढो और पढने दो !
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचन उपक्रम राबवण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हिंदी भाषा शिक्षक मनीष उघडे यांनी साधारण पंचवीस ते तीस वर्षापासून संग्रहित केलेले हिंदी मराठी वर्तमानपत्र मासिके व लहान लहान बोधकथा यांची कात्रणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. शालेयताशिकेत चट पिरीयड असल्यास व विद्यार्थ्यां जवळ वेळ शिल्लक असल्यास ते त्यांच्या आवडीने कात्रण घेऊन वाचन करतात. या कात्रणात ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, पर्यावरण, मनोरंजन यांच्याशी निगडित माहिती आहे. जी भविष्यात मुलांना उपयोगी पडणारी आहे शिवाय वर्तमानपत्रात विविध विषयांवर लेखन करताना देखील मदत होणार आहे. या उपक्रमाद्वारे हसत खेळत ज्ञानाची गोडी, वाचनाची सवय, स्वयंशिस्त, जाणून घेण्याचे कुतूहल, संग्रह वृत्ती, संशोधन वृत्ती वाढीस लागणार आहे.
सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. सदर उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः कात्रणे सांभाळण्याची व विद्यार्थ्यांना वितरण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच या उपक्रमामुळे वाचन भाषण या क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. सदर उपक्रमाचे कौतुक संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले आहे.