• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेर संघाचा प्रथम क्रमांक…

Sep 25, 2024

Loading

महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत
अमळनेर संघाचा प्रथम क्रमांक…

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर 2024 संपन्न झाल्या याचे उदघाटक शांताराम जाधव साहेब होते. तर आयोजक भीमज्योत शेजवळ होते.
महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत एकूण 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात अमरावती बुलढाणा परभणी हिंगोली वर्धा धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर संघ प्रथम क्रमांक पटकावला. अमळनेरातील मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघाने वर्चस्व कायम ठेवले व अंमळनेर संघाला प्रथम क्रमांक मिळाला
अमळनेर येथील यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे हरीष सोनवणे, अतुल सुरळकर, पूर्वेश मोराणकर, प्रतीक मोराणकर, अनिकेत पाटील, दक्ष पाटील, मल्हार सोनार, वेदांत वानखेडे, समन्तक देशमुख, कृष्णा गोसावी, स्वरांश सूर्यवंशी, अनय भांडारकर, सुदर्शन कोळी, प्रांजली इशी, पीहल पाटील, तेजस्विनी जाधव, हिंदवी निकम, स्वरा खेडकर, अनुश्री चौधरी, दिव्यानी पवार, प्रियांशी भदाणे, माही दाभाडे, भाविका शेटे, आराध्या ठाकूर, सुकेशनी सपकाळे
यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे व मास्टर करंदीकर सरांचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे..

लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला! अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed