सरकारच्या योजनांचा उत्सव महीलांनी अनुभवला – डॉ. नीलम गोऱ्हे
*पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :* शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर आहे. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी या आठवड्यात विविध ठिकाणी गेल्या असता तेथील महिलांशी संवाद साधत सरकारच्या योजनांची माहिती व सरकार कडे त्यांचा असणाऱ्या अपेक्षा आदी अनेक महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा केली याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी शिवसेना भवन पुणे, येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, जयश्री पलांडे ,शैला पाचपुते , नेहा शिंदे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये २८ सप्टेंबर रोजी खेड, राजगुरू नगर, चर्होली,आळंदी, मंदिर परिसर, येथे भेटी घेत लाडक्या बहिणी सोबत संवाद साधला.
२९ सप्टेंबर रोजी भोर तालुक्यातील कापूरहोळ व धांगडवाडी येथे महाविजय संवाद मेळाव्यात संबोधित करून भोर तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.येथे २०००जनसमुदाय हजर होता , त्यात १०००महिला होत्या .
३० सप्टेंबर रोजी नारायण गावातील सफाई कर्मचारी वसाहत, शेलार विहार कॉलनी, आवटी मळा, वैदू वसाहत येथील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तसेच ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या त्यांच्या सोबत चर्चा साधत सरकारच्या वयोश्री, आरोग्य सहाय्यता निधी, युवक योजनांची माहिती देखील दिली. पिंपळवंडी तर जुन्नर शहर येथे मा. आमदार शरद सोनवणे आयोजित १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित करून सरकार आपल्या पाठीशी आहे असा विश्वास उपस्थितांना दिला असल्याचे देखील त्यांनी सांगीतले.
जागा वाटप बाबत विषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जरी काही विरोधी पक्षाच्या वतीने काही मतदार संघात उमेदवार जाहीर केले असले तरी आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून मतदार जनते समोर जाणार आहोत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य उमेदवार दिला जाईल. इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी महायुती म्हणून पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून येईल यासाठी योग्य व्यक्तीला न्याय मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.