मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,
“आधार एक हात मदतीचा”
चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त
पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट.
ठाणे: कल्याण( प्रतिनिधी)
कल्याण येथील माध्यमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते
श्री. सुनिल रामदास शिंपी( मांडगे ) यांचे सुपुत्र , चिं.साहिल याचा २४ व्या वाढीदिसानिमित,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, टिटवाळा,म्हसकल येथील “पारस बालभवन,मधील चिमुकल्या मुलांसोबत अत्यंत आनंदात चि.साहिल मांडगे यांचा वाढदिवसानिमित्त ,तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, पोहे, गोडेतेल,साखर, मीठ, बिस्किट्स, शेंगदाणे आणि इतर जीवनावश्यक किराणा साहित्य देण्यात आले, पारस बालभवन चा संस्थापिका सौ.संगीता गुंजाळ यांनी विशेष आभार व्यक्त करत सांगितले की, डॉ. मनिलाल शिंपी यांची या अनाथ चिमुकल्या मुलांवर खूप माया, व लक्ष आहे, शिंपी सरांमुळे आम्हाला खूप मदत उपलब्ध होत असते, असे सांगितले.यावेळी कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री. अरविंद शिंपी,खजिनदार प्रवीण भांडारकर, सौ. मांडगे मॅडम यांनाही लहान मुलांचे नाच गाणे पाहून खूप आनंद झाला.तसेच यावेळी टिटवाळा परिसरातील कब्बडीपटू खेळाडू उपस्थित होते, श्री. सुनिल रामदास शिंपी(मांडगे) सरांनी देखील पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांसोबत आनंद व्यक्त केला.