“अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यकुशल आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
आमदार अनिल दादा पाटील यांनी अमळनेर तालुक्यात नावीन्यपूर्ण विकास योजना, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, तसेच शहर व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
विशेषतः पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवजीवन ठरली असून, त्यामुळे शेती सिंचनाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर शहर व तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले गेले असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जनतेच्या मनात घर करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या अनिल दादांनी विकासाची नवी दिशा दिली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यासाठी नवे यश लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करताना आमदार दादांच्या नेतृत्वात अमळनेरचा विकास अशीच भरारी घेईल, याच अपेक्षा!
🎉🎂💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂🎉
— शुभेच्छुक:
मा. एस.सी. तेले सर
तालुकाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भटक्या व विमुक्त जाती सेल), अमळनेर
सेवानिवृत्त पर्यवेक्षक – के.डी. गायकवाड विद्यालय, अमळनेर
सचिव –राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, अमळनेर