*शिवभक्त विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न.*
ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) आपल्या महाराष्ट्राची परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासावे,मुलांचे जीवन संस्कारमय व्हावे म्हणून आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी’ आपल्या शिवभक्त विद्या मंदिर, सिंड्रेला इंग्लिश स्कूल,शंभूराजे विद्यामंदिर,एम के पाटील विद्यालय बदलापूर मध्ये शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व बदलापुरातील वारकरी संप्रदायी ग्रामस्थ यांच्या समवेत दिंडी सोहळा मोठ्या थाटाने साजरा केला. गेल्या 26 वर्षापासून हा दिंडी सोहळा शाळेत आयोजित केला जातो,बदलापुरमधील वडवली गाव ते ज्ञानप्रभा विद्यापीठ असा 2 किलोमीटर पर्यंतचा पायी प्रवास करत विठ्ठलाचे, व संतांचे नामस्मरण,अभंग, ओव्या विद्यार्थ्यांसह गात उत्साहात साजरा केला, दिंडी सोहळ्याची सांगता ज्ञानप्रभा विद्यापीठाचे मठाधिपती १००८ स्वामी अभेदानंदजी महाराज यांच्या आशीर्वाद पर मार्गदर्शनाने सांगता झाली.