श्रीमंती सुनंदा पाटील यांना ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
World Humanity Commission (USA) या 18 ते 20 देशांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने, लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, कृषी, संरक्षण, उद्योग व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
धार~मालपूर, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमंती सुनंदा अशोक पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार वर्ल्ड ह्युमनिटी कमिशनचे नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर श्री विजयकुमार बन्साली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रभाकर महाले (पालेशा कॉलेज), उपप्राचार्य प्रा. डॉ. उमेश गांगुर्डे (प्रसिद्ध कीर्तनकार) व श्री. हितेंद्र पवार (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी) उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मान्यवर पुरस्कारार्थी या गौरव सोहळ्यास साक्षीदार ठरले.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन प्रा. प्रमोद पाटील सर व सौ. प्रिया पाटील मॅडम यांनी केले होते.
श्रीमंती सुनंदा पाटील या साने गुरुजी शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री मनोहर पाटील सर यांची धर्मपत्नी असून, त्यांचा हा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.