“अमळनेर बदलतोय… विश्वासाचं दुसरं नाव – अनिल दादा पाटील!”
अमळनेर प्रतिनिधी
“आपण समाजाचे देणे लागतो” या तत्त्वाने कार्यरत राहत, अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत झटणारे आमदार तथा माजी मंत्री अनिलदादा पाटील हे आज तालुक्याच्या जनतेसाठी विश्वासाचे, विकासाचे आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दादांच्या कार्यकाळात अमळनेर शहर आणि तालुक्याच्या विकासात झपाट्याने प्रगती झाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा आणि सांस्कृतिक सुविधा यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरत असून, सिंचन सुविधांमुळे शेतीला नवी दिशा मिळणार आहे.
“अमळनेर बदलतोय” हे स्वप्न आता वास्तवात उतरते आहे. शहरामध्ये जलसंपदा विकास, दर्जेदार रस्ते, नवे शैक्षणिक व आरोग्य प्रकल्प, आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार झाला आहे.
सामाजिक न्याय, ग्रामीण उत्थान आणि शेतकरी कल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या मनात घर करून गेले आहेत. त्यांची लोकसंग्राहक शैली, अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाभिमुख निर्णय अमळनेरच्या परिवर्तनाची ग्वाही देतात.त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील– यांचाही सक्रिय सहभाग असून त्या देखील शहराच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
तमाम अमळनेर कर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून धन्यवाद..