• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024′, मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर क्षेत्र-अध्यात्मिक.. ,अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Oct 31, 2024

Loading

‘कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024’,
मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर

क्षेत्र-अध्यात्मिक..

अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

वर्षानुवर्षे संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, श्रीमंत प्रतापजी व विप्रो कंपनीची उद्योगभूमी, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी हीच अमळनेरची ओळख होती व आहे. गेल्या काही वर्षात मात्र श्री मंगळदेव ग्रह मंदिर करीत असलेल्या धार्मिक कार्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावरील जनकल्याणकारी कार्यामुळे देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ख्यातनाम झाले आहे. या मंदिरामुळेच आता अमळनेरला ‘मंगल नगरी’ ही कौतुकास्पद व अभिमानास्पद ओळख प्राप्त झाली आहे.

*कोणतेही देवस्थान म्हटले, की पूजा-अर्चा, भजन, कीर्तन, तीर्थप्रसाद, धार्मिक उत्सव असेच त्या चौकटीबद्ध स्वरूप असते. धार्मिक कार्याव्यतिरिक्त सामाजिक जाणिवेचे उचित मान ठेवून मोठ्या प्रमाणावर जनकल्याणकारी कार्यही करता येते, असे दृश्य खूपच कमी देवस्थानांतून पाहावयास मिळते. अशा देवस्थानांच्या श्रेयनामावलीत मंगळग्रह सेवा संस्था संचलित अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर है निश्चितच अग्रस्थानी आहे.*

अनेक देवस्थानामध्ये भाविक मंदिराच्या परिसरात पोहोचताच विविध प्रकारच्या टॅक्सच्या अधिकृत व काही ठिकाणी अनधिकृतही पावत्या फाडण्याची सक्ती केली जाते. टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगसाठीही अनेक ठिकाणी अव्याच्या सव्वा रक्कम द्यावी लागते. लवकर दर्शनासाठी भरपूर पैसे लाटणाऱ्या दलालांचीही अनेक ठिकाणी भरमार आहे. मंदिरांच्या अधिकृत दक्षिणांच्या व्यतिरिक्तही या ना त्या कारणास्तव काही ठिकाणी पैसे लाटले जातात. त्यामुळे सांसारिक जीवनात त्रस्त झालेले जे भाविक ईश्वरीय व आत्मिक शांती लाभावी यासाठी देवस्थानांना भेटी देतात ते मनोमन खूप दुःखों व नाराज होतात. पूजा साहित्य विकणारे व खानपान व्यावसायिकही भाविकांची ज्या पद्धतीने लूट करतात ते पाहूनही भाविकांच्या मनःस्थितीवर विपरीत परिणाम होतात. अनेक देवस्थानांमध्ये जादा पैसे देऊन ‘व्हीआयपी दर्शन’ या गोडस नावाने भाविकांकडून पैसे उकळले जातात. वामुळे आलेल्या भाविकांमध्ये दुजाभावही केला जातो. परिणामी अनेक भाविक या प्रकारामुळे दुःखी व वैफल्यग्रस्तही होतात. खरेतर देवस्थानात गेल्यावर आनंद, उत्साह, मानसिक, आत्मिक व भावनिक शांतीची अनुभूती झाली पाहिजे, तेथील वातावरण निकोप, स्वच्छ व प्रसन्न असले पाहिजे, अशी सर्वच भाविकांची इच्छा अपेक्षा असते. त्यात वावगे काहीच नाही. मात्र अनेक देवस्थानांमध्ये भाविकांचा भ्रमनिरास होतो. या भ्रमनिरासाचा लवलेशही अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात जाणवत नाही. तेथे कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही, टू व्हीलर, फोर व्हीलर पार्किंग आणि चप्पल स्टॅन्डची सेवा पूर्णतः मोफत आहे. मंदिरात प्रत्येक नळातून येणारे पाणी हे ‘आर ओ वॉटर’ आहे. ते निःशुल्क मिळते. इतकेच नव्हे, तर जगातील सर्वांत शुद्ध व महाग असलेले ‘केंगेन वॉटर’ ही मंदिरात निःशुल्क मिळते. तेथे ‘देवादारी सारे समान’ हा बोर्डच लावला आहे. त्यामुळे जादा पैसे देऊन लवकर नंबर लावणे किंवा व्हीआयपी दर्शन हा प्रकारच नाही. जो प्रथम येईल त्याचा अग्रक्रम हीच सिस्टीम अतिशय काटेकोर पद्धतीने अमलात आणली जाते. मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यासह इतरही वस्तू विक्रीची अनेक दुकाने आहेत. एकाही दुकानदाराकडून मंदिर व्यवस्थापन एक रुपयाही भाडे घेत नाही. मात्र त्या मोबदल्यात मंदिर व्यवस्थापन दुकानदारांकडून भाविकांची लूटमार होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेते. कोणत्याही व्यावसायिकाला मनमानी दराने विक्री करता येत नाही. सर्व व्यावसायिकांना मंदिर व्यवस्थापनाने ठरविलेल्या दरातच विक्री करावी लागते. प्रत्येक दुकानदाराला मंदिर र व्यवस्थापनाने ठरवून दिलेले रेटबोर्ड लावणे सक्तीचे आहे. भारतातील कोणत्याही देवस्थानात मिळणार नाही अशा प्रकारचा अनेकार्थी वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत चविष्ट महाप्रसाद या मंदिरात मिळतो. गेल्या तीन वर्षांपासून शुद्ध गावरान तुपातील वरणयट्टी, गावरान तुपातील गुळाची जिलेबी, बासमती जिरा राईस, काजू पेस्टचे सारण असलेली वांगी-बटाट्याची भाजी, हिरवी मिरचीची भाजी, लिंबू असा महाप्रसाद फक्त ३६ रुपयांत दिला जात होता. मात्र हल्लीच्या सर्वच बाबतीतील महागाईच्या पार्श्वभूमीवर हा महाप्रसाद आता ५४ रुपयांत दिला जातो. वांगी बटाट्याची भाजी वगळता सर्व पदार्थ कांदा, लसूण विरहित असतात. त्यामुळे सर्व धर्म व पंथांच्या भाविकांना हा महाप्रसाद घेता येतो. मंदिर परिसरातील स्वच्छता, हिरवळ, कारंजे आदींमुळे वातावरण अत्यंत प्रसन्न असते. मंदिरातील सर्व सेवेकरी अत्यंत नम्र व तत्पर सेवेसाठी ख्यातनाम झाले आहेत. मंदिर व्यवस्थापनाकडून त्यांना मिळणारा पगार व अन्य सवलती देशातील देवस्थानेच नव्हे, तर मोठमोठे उद्योग, व्यवसाय व प्रतिष्ठानांमध्येही मिळत नाही. त्यामुळे एकही सेवेकरी कोणत्याही भाविकाकडून पैसे मागत नाही. कोणी त्यांना

 

पैसे देण्याचा प्रयत्न केला, तर ते नम्रपणे नकार देऊन पैसे दानपेटीत टाकण्याची विनंती करतात. हा प्रकारही निश्चितपणे दुर्मिळ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मंदिराची स्वतःची खूप मोठी नर्सरी आहे. त्या माध्यमातून वर्षभरातून सुमारे एक लाख रोपे वितरीत केली जातात. मंदिरातील सर्व प्रकारचा काडी कचरा, पाने, फुले व निर्माल्यात गीर गायींचे शेण व गोमूत्र टाकून मोठ्या प्रमाणावर गांडूळ खताची निर्मिती केली जाते. प्लास्टीक बंदी, हुंडा बंदी, नशा, बंदी, राष्ट्रप्रेम, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी मंदिर २ व्यवस्थापनाचे वर्षभर उपक्रम सुरू असतात. चायनीज मालावर बंदीयायत तर मंदिर व्यवस्थापन सर्वच भाविकांना शपथ घ्यावयास सांगते. शेतकल्यांच्या हितार्थ व मार्गदर्शनाथीही वर्षभर कार्य सुरू असते. हजारो विद्याथ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य दिले जाते. शासन व सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी सहकार्य केले जाते. संपूर्ण विश्वात कुठेही साजरा होत नाही अशा पद्धतीचे व अति भव्य प्रमाणात मंदिरात श्री मंगळग्रह जन्मोत्सव व तुलसी विवाह महासोहळा साजरा केला जातो. मंदिराला चार ‘आयएसओ’ मानांकने

 

आहेत. मंदिराच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने विशेष पाकीट जारी केले आहे. शासनाने पर्यटन मित्र या पुरस्काराने गौरवीत केले आहे. पानी फाऊंडेशननेही सन्मानित केले आहे. अनेक देवस्थानांचे व संस्थांचे विश्वस्त तथा पदाधिकारी मार्गदर्शन घेण्यासाठी येथे नेहमी येतात. भविष्यातही अनेक व भरीव स्वरूपात जनकल्याणकारी योजना तथा उपक्रम राबविण्यासाठी मंदिराच्या योजना तयार आहेत. लवकरच त्या कार्यान्वित होतील. परिणामी नित्य नव्या व सर्वाथनि आदर्शवत आयामांना स्पर्श करून मंगळग्रह सेवा संस्थेची अनुकरणीय व प्रेरणादायी, कीर्ती क्षितिजापार जाईल, हे निश्चित !
मंगळ ग्रह संस्थेचा अध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल
मराठी लाईव्ह न्युज या लोकप्रिय वेब पोर्टलच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘सत्कार कर्तृत्वाचा’ या कार्यक्रमात सन्मान होत आहे…
संस्थेच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed