• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठी लाईव्ह न्युज पोर्टलने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद-सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाडकर, मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान..

Nov 8, 2024

Loading

मराठी लाईव्ह न्युज पोर्टलने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद-सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाडकर,

मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान..

अमळनेर प्रतिनिधी
निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी पाच वर्षाच्या अल्प काळात मराठी लाईव्ह न्युज पोर्टलने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या दहा व्यक्तींना ‘कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
पत्रकारिता करतांना समाजमन व सामाजिक बांधीलकी मराठी लाईव्ह न्युज जोपासत आहे असे सांगितले.

 

अगोदर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले..
विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, प्रमुख अतिथी नाशिक चे आदिवासी विकास महामंडळाचे उपयुक्त कपील पवार, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, देवगाव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील ,ज्येष्ठ साहित्य प्रा वा.ना आंधळे, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ.एस.ओ.माळी, मराठी वांग्मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन यांनी केले.कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तर उत्कृष्ट डिझाईनर कामासाठी सहकार्य करणारे लक्ष्मीकांत सोनार यांचादेखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

*’कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ चे मानकरी*
मंगळग्रंह सेवा संस्था अमळनेर(आध्यात्मिक),विजय पाटील स्वादिष्ट नमकीन अमळनेर युवा उदयोजक,प्रा.सुभाष पाटील कृषी क्षेत्र,डॉ प्रशांत शिंदे वैद्यकीय, सौ सुषमाताई देसले राजकीय क्षेत्र, शरद धनगर साहित्यिक क्षेत्र, आर.आर.सोनवणे सेवापूर्ती सन्मान, सुनील वाघ क्रिडा क्षेत्र, सौ छाया पाटील सामाजिक क्षेत्र,सागर कोळी युवा प्रेरणा पुरस्कार या सर्व पुरस्कारर्थी बांधव व भगिनी यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापनदिनाला मार्गदर्शन करतांना म्हणाले की
जेष्ठ साहित्यिक वा. ना. आंधळे म्हणाले की, एखाद्याचा सत्कार होणे म्हणजे कान टोचण्याचा प्रकार. सत्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीला जबाबदारी स्विकारुन अधिक चांगले काम करावे लागते. सत्कारातून प्रेरणा मिळत असते. आधाराशिवाय जो माणूस चालतो तोच उंची गाठतो हे सांगताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रतनजी टाटा यांची उदाहरणे दिली.
नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ जयदीप पाटील म्हणाले की
आपण विचार करत असाल, “काळ आणि तंत्रज्ञानाचे परिवर्तन कसे साक्षात्कारात आणले आहे?” तर, डिजिटल पत्रकारितेच्या युगात सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या युगात, एका बटनाच्या टप्प्यावर, जगभरातील बातम्या काही क्षणात वाचकांपर्यंत पोहचतात. या गतीमुळे प्रिंट मिडीयाचे महत्त्व कमी होत चालले आहे का?. पण, पत्रकारिता ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाही; ती एक शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर कसा आणि कशासाठी केला जातो हे पत्रकारांवर अवलंबून आहे. असे अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला कर्तृत्व गौरव सन्मान कार्यक्रमात प्रमुख अतिथी नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ जयदीप पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते..

 

 

पत्रकार समाज घडविण्याचे व दिशा देण्याचे काम करीत असतो. पत्रकारितेत झपाट्याने वाढ होत आहे. सोबतच जिल्हा आवृत्त्या स्वतंत्र झाल्याने सर्वत्र बातमी येईलच याची शाश्वती नसते. प्रिंट मीडिया कमी होत होत असून वेब पोर्टल, चॅनल्स वाढत आहेत. डिजिटल युगात मेसेज फॉरवर्ड करताना जागरुक असणे आवश्यक असल्याचे महात्मा फुले हायस्कूल देवगांव चे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी सांगितले. एखादं पद मिळवणं व ते टिकवण्यासाठी व्यक्तीमत्व चांगलं असावं लागतं. एखाद्या कृतीला स्वतःचे उत्तर असावं. ज्येष्ठ लोकांकडून तो ठेवा जपायला हवा असे विचार आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपायुक्त
कपिल पवार यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ डिगंबर महाले म्हणाले की सध्याची पत्रकारितेत डिजीटल मिडीयाचे महत्त्व वाढले आहे. सांगत एखादया मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापन दिनाला दरवर्षी कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले..
यावेळी मराठी लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक ईश्वर महाजन व कार्यकारी संपादिका ज्योती ईश्वर महाजन यांचा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत सत्कार केला.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
प्रा.अशोक पवार, धनगर दला, श्याम पवार, एस.डी देशमुख सर, माळी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी दिनेश माळी, विजय पवार, महाजन, एन.आर चौधरी, दिलीप सोनवणे, दीपक पवार ,दिलीप पाटील, राजेंद्र पाटील,बी.एस.जाधव,मा.नगरसेवक प्रताप साळी, उदयोजक निलेश पाटील, प्रभुदास पाटील ,मुख्याध्यापक प्रकाश पाटील, श्रीमती अनिता बोरसे ,काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संगीता पाटील,मुकेश पाटील सर,अमोल पाटील, भैय्यासाहेब मगर, विनोद जाधव,डॉ विशाल बडगुजर, रवि पाटील,मधु बाळापूरे,प्रमोद पाटील, महेश पाटील, दशरथ लांडगे, बापू मास्तर, ए.एन महाजन सर, देवेंद्र महाजनसर, मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के,पक्षीमित्र जितेंद्र वाणी,हडपे सर,निरंजन पेंढारे,
एस.के.महाजन,डिझायनर, साई पिंगळे,
लक्ष्मीकांत सोनार,रवींद्र चौधरी, रणजित शिंदे,डॉ रवींद्र चौधरी,गणेश भामरे,,मंगळ ग्रह संस्थेचे सर्व पदाधिकारी,सर्व पत्रकार मित्र,हिंदी अध्यापक मंडळ, वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ,सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार
सह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक व विविध पदाधिकारी बंधू व भगिनी उपस्थित होते.
उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *