सामाजिक चळवळीला पाठबळ देणारे चैनल मराठी लाईव्ह न्युज !!!
पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजाचा आरसा होण्याचे भाग्य पत्रकारिता क्षेत्राला लाभले आहे. आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता केवळ प्रिंट मीडिया न राहता त्यात नवीन डिजिटल मीडियाने भर घातली आहे. जगातील कोणतीही घटना ,प्रसंग काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद डिजिटल मीडियामध्ये आहे. विविध चैनल च्या मार्फत बातमी तात्काळ पोचवली जाते. जगात अनेक देशात या डिजिटल मीडियाने खळबळ निर्माण केलेली आहे. अनेक लेखकांनी आपल्या विचारांनी सत्ताधाऱ्यांना हलवून सोडले आहे. जगाला विचार करायला भाग पाडले आहे. कर्नाटकातील सत्ता बदल यात डिजिटल मीडियाने सातत्यपूर्ण जनजागृती करणे काम केले त्यामुळे भ्रष्टाचारी सरकार पडून सत्तांतर घडले. प्रामाणिक पत्रकारिता असेल तर समाजात त्या पत्रकारितेचे विशेष स्थान असते. काही पत्रकारांनी डिजिटल मीडिया मार्फत उत्तम काम करण्याची उदाहरणे दिसून येतात. अमळनेर तालुक्यातील मराठी लाईव्ह न्युज हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आहे. सर्वात जलद गतीने बातमी देण्याचे कार्य मराठी लाईव्ह करून दाखवले आहे. आज मराठी लाईव्ह न्युज लावा पाच वर्ष पूर्ण होत आहे. खानदेशातील सर्व स्तरातील बातम्या, विचारवंतांचे लेख, घडामोडी, सामाजिक चळवळी याबाबत अप्रतिम मांडणी करून समाजाला प्रोत्साहित करण्याचे काम केलेले आहे. ह्या मराठी लाईव्ह न्युज चॅनल कार्यकारी संपादक ईश्वर महाजन पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित नाव असलेले पत्रकार आहेत. मराठी लाईव्ह न्युज अगोदर त्यांनी प्रिंट मीडियामध्ये पत्रकार म्हणून काम केलेले आहे. अजूनही प्रिंट मीडियामध्ये सुद्धा त्यांचे काम अद्याप पर्यंत चालू आहे. एका खेड्यातून आलेला होतकरु पत्रकार आपल्या प्रामाणिक सेवेमुळे जनतेच्या गळ्यातील काहीच बनलेला आहे. सत्य ते मांडण्याचे धाडस त्यांनी आजपर्यंत दाखवलेले आहे. कुणाचाही हेवा न करता सत्याला धरून आपली पत्रकारिता त्यांनी केलेली आहे. अनेक परखड पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, इतिहासकार यांची त्यांना सोबत आहे. त्यात जयसिंग वाघ, गोकुळ बागुल, मिलिंद बागुल, विजय लुल्ले, जी .टी टाक, सोपान भवरे, दिगंबर महाले,भाऊसाहेब देशमुख, संजय सूर्यवंशी, प्राध्यापक रमेश माने, उदय नरे ह्या लोकांनी वेळोवेळी सहकार्य करून मराठी लाईव्ह न्युज ला महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी सहकार्य केलेले आहे. मराठी लाइव न्युज समाजातील चांगल्या घटनांना न्याय दिलेला आहे. एक मितभाषी पत्रकार स्नेह जपत पत्रकारिता करतो हे या क्षेत्रातील विशेष उदाहरण आहे. माता जिजाऊ, अहिल्याबाई,छत्रपती शिवबा,महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीमाई, डॉक्टर बाबासाहेब यावर अभ्यासपूर्ण लेख मराठी लाईव्ह न्यूज ने दिलेले आहे. माणसाला जोडणारा पत्रकार म्हणून ईश्वर महाजन यांना ओळखले जाते. मराठी लाईव्ह न्युज मागच्या वर्षापासून सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यामुळे अनेक लोकांना आदर्श म्हणून नव्या पिढीला बोध घेता येईल यासाठी सन्मान कर्तृत्वाचा ही मालिका सुरू ठेवलेली आहे. ईश्वर महाजन सरांचा मित्रांचा गोतावळा फार मोठा आहे. शांत, सभ्य, सुसंस्कृत, मधाळ वाणी यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळा बहर आलेला आहे. सर्व राजकीय लोक त्यांच्या विविध बातम्या तात्काळ देण्याचे काम मराठी लाईव्ह न्युज ने केलेले आहे. अशा ह्या चॅनलला भावी वाटचालीस लेखन मंच परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!!
सोपान भवरे
उपसंपादक लेखन मंच साप्ताहिक