
अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या उदयाच्या निकालाकडे लागले उमेदवारांचे लक्ष… दोन्ही दादांपैकी कोण, का डॉक्टर?? कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे चर्चा..
अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या उदयाच्या निकालाकडे लागले उमेदवारांचे लक्ष…
दोन्ही दादांपैकी कोण, का डॉक्टर??
कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे चर्चा..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत मंत्री अनिल भाईदास पाटील हे महायुतीचे उमेदवार होते तर माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी व महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे यांची निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती.. सर्व तिन्ही उमेदवारांकडून विजय आमचाच होईल असे बोलले जात आहे.. अमळनेर विधानसभा निवडणुकीमध्ये 65 टक्के पर्यंत मतदान झाले आहे.. थोड्याफार म्हणजे पाच ते सात हजार मतांनी विजयी उमेदवार होईल अशी सध्या चर्चा आहे ..मतदार बांधव कोणाच्या बाजूने कौल देतील हे काही तासातच समजणार आहे पण तिन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे हे तेवढे सत्य ..कारण कोण काय सांगत यापेक्षा मतदारांनी कोणाला कौल दिला आहे मतपेटी द्वारे ही उद्याच्या निकालाने समजणार आहे ..जास्त मतदान कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. अमळनेर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.. विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी व महाविकास आघाडीचे डॉक्टर अनिल शिंदे यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार प्रसार केला होता पण प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की आपलं विजय आपलाच आहे पण मतदार बांधव कोणाच्या बाजूने उभे राहतील याकडे लक्ष लागले आहे..
निवडणुकीमध्ये हार जीत चालू राहते निवडणूक अमळनेर तालुक्यात शांततापूर्ण मार्गाने उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व सर्व महसूल यंत्रणा,पोलीस निरीक्षक विकास देवरे व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे..