• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण अमळनेर प्रतिनिधी

Dec 4, 2024

Loading

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण

अमळनेर प्रतिनिधी
देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकनाचा उपक्रम राबविण्यात आला. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या निवडक 141 शाळा मधील इयत्ता 3 री,इयत्ता 6 वी , इयत्ता 9 वी चा वर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यात अंमळनेर तालुक्यातील 6 शाळांचा समावेश असून त्यातील अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांची दोन तुकड्यांपैकी निवड पद्धतीने एक तुकडी निवडून त्यातील 49 विद्यार्थ्यांपैकी परीक्षेकरिता 30 विद्यार्थ्यांची परत निवड करण्यात त्या 30 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण करिता निरीक्षक (CBSC) म्हणून श्रीमती.शुभांगी योगेश पाटील व क्षेत्रीय अन्वेषक म्हणून श्री.किशोर राजधर पाटील यांनी जबाबदारी सांभाळली व शाळेचे प्राचार्य श्री.निरज विनायक चव्हाण व शाळेतील शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *