• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर द्वारा संचालित डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय विटनेर ता.जि. जळगांव* येथे दिनांक 10/12/2024 ते 11/12/2024 या दोन दिवसात स्काऊट शिबिर उत्साहात संपन्न

Dec 12, 2024

Loading

शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर द्वारा संचालित
डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय विटनेर ता.जि. जळगांव* येथे
दिनांक 10/12/2024 ते 11/12/2024 या दोन दिवसात स्काऊट शिबिर उत्साहात संपन्न झाले.
पहिला दिवस
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सकाळी आपल्या संघानुसार टेंट उभारणी केली. त्यानंतर ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी स्काऊट प्रार्थना व झेंडा गीत म्हटले.
प्रथम सत्र सुरू झाले. विद्यालयाचे उपशिक्षक आदरणीय श्री डी एस पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक माहिती ऐकून महत्त्वाच्या नोंदी लिहून घेतल्या. त्यानंतर द्वितीय सत्र हे विद्यालयाचे आदरणीय श्री बी यु राजपूत सरांनी घेतले. स्काऊट व गाईड बद्दल विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.त्यानंतर सांघिक खेळ विद्यालयाचे आदरणीय श्री के ए तायडे सर व श्री एल एस पाटील सर यांनी घेतले.त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वाव मिळावा यासाठी शेकोटी कार्यक्रम सायंकाळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य आदरणीय श्री व्ही सी परदेशी यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी शेकोटीच्या समोर स्काऊटचे नियम सांगितले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे मिळाली.
दुसरा दिवस
सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने चहा व नाश्ता देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टेन्ट सजावट केली. टेन्ट सजावटीचे परीक्षण विद्यालयातील नेमून दिलेल्या शिक्षकांनी केले.त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करावयाचा होता म्हणून संघनायकाने दिलेली जबाबदारी प्रत्येक स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी पार पाडली. सर्व स्काऊट गाईड नी स्वतः बनवलेले जेवण केले.

त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यामध्ये संघनायक व स्काऊट गाईड नी आपली मनोगते व्यक्त केली.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी दोन दिवसाच्या शिबिरामध्ये आलेले अनुभव मांडले. शिक्षक मनोगते झाली.
त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी एस बाविस्कर सरांचे मनोगत झाले.दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा सरांनी मांडला .त्यामध्ये विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले व सहकार्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला.अश्या प्रकारे कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *