*जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम*
दिनांक १३ डिसेंबर ते २६ जानेवारी पर्यंत जळगाव जिल्ह्यात वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद csir व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद niscpr व सर्वोदय इन्फोटेक मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी किसान सभा एप्लीकेशन ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करता येईल व शेतमालाचे आधुनिक पद्धतीने वाहतूक करण्यास मदत होईल, या साठी संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांसाठी अल्प दरात किसान कार्ड योजना राबवण्यात येत आहे.
किसान कार्ड योजनेचे अनेक फायदे आहेत, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची कृषी माहिती सहज किसान कार्ड च्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही बाजारपेठेतील पिकांची किंमत सहजतेने कळेल. शेतकऱ्यांना डायरेक्ट कंपनी डीलरशिप संपर्क साधता येईल. शेतकऱ्यांनी तयार केलेले अन्नपदार्थ जसे की लोणचे घरगुती वस्तू , स्वयंचलित उद्योगाचे सामान सहजतेने विकले जाऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी शेतीशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी सार्थक कार्यशाळा. किसान सभा कार्डचे ध्येय हे आहे की शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करणे आणि त्यामध्ये सूट मिळवणे आणि संबंधित व्यापाऱ्यांशी थेट संबंध साधने. सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची संपूर्ण माहिती शेतकरी मंडी डीलर कृषी केंद्र व ट्रान्सपोर्ट पर्यंत पोहोचवणे जे यांच्यापर्यंत पोहोचत नाही जे शेतकरी मंडळ , मंडी डीलर कृषी केंद्र व ट्रान्सपोर्ट यांचे हित सुधारण्याच्या प्रयत्न किसान सभा कार्डच्या माध्यमातून करण्यात येत आहे. किसान सभा माध्यमातून एक चैन निर्धारित केली जात आहे ज्यामध्ये एक सोबत शेतकरी , मंडी डीलर ट्रान्सपोर्ट व कृषक यंत्र डीलर व शेतकरी संघटना जे शेतकऱ्यांचे हित व सुविधांसाठी प्रयत्न करतात त्यांना किसान सभेच्या माध्यमातून जोडले जात आहे.
किसान कार्ड सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे ज्यात सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील हर कदम हर डगर किसान का हमसफर कृषी क्षेत्राशी संबंधित आहे मंडी डीलर ट्रान्सपोर्ट , उर्वरक कीटकनाशक डीलर, कृषी यंत्र उत्पादक जे आपल्या सेवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किसान सभा ॲप शी जुडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देतील.
या प्रकारे संपूर्ण राज्यभरात किसान सभेचे कार्य केले जात आहे. आपल्या जळगाव , धुळे जिल्ह्यात ही ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे किसान सभा कार्डचे कर्मचारी प्रत्येक गावात येऊन कॅम्प आयोजित करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा , असे आव्हान करण्यात येत आहे.