
भूतकाळात अडकून न पडता, भविष्याचा वेध घेत कार्य करा-संदीप घोरपडे साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे इ. 10 वी. मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
भूतकाळात अडकून न पडता, भविष्याचा वेध घेत कार्य करा-संदीप घोरपडे
साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे इ. 10 वी. मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे शालांत परीक्षा- फेब्रु-2025 साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थीनिंसाठी सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव संदीपजी घोरपडे यांच्या हस्ते दि. 16.12.2024 रोजी करण्यात आले. सदर शिबीर हे. 20.12.2024 पर्यंत घेतले जाणार आहे. सदर मार्गदर्शनाची संकल्पना मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे यांची असून संस्थेच्या मार्गदर्शनाने व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी रित्या दरवर्षी राबविली जाते. यावेळी अध्यक्षीय मनोगतात श्री. संदीप घोरपडे यांनी”भूतकाळात अडकून न पडता, भविष्याचा वेध घेत कार्य केले पाहिजे” असे सांगून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे यांनी सांगितले की, सराव व पूर्व परीक्षेतील गुणांकडे पाहताना आपले गुण ज्या मुद्द्यांचा अभ्यास न झाल्याने गेले आहेत त्या मुद्द्यांचा सराव करा व गैरमार्गमुक्त परीक्षा द्या असे सांगून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
सदर शिबीरास अध्यक्ष मा. आबासो. श्री. हेमकांत पाटील, व संस्थेचे पदाधिकारी, गुणवंतराव पाटील, अशोक बाविस्कर, अमृत बाजीराव पाटील, मा. डाँ देशमुख, मा. प्राचार्य श्री. डॉ. शेख सर, भास्करराव बोरसे, मगन वामन पाटील, किरण पाटील, आदींनी बहुमोल मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन शिबीरास परीक्षक व मॉडरेटर यांनी पुढील प्रमाणे विषयानुरूप मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन सत्राच्या सुरुवातीस विषय गीताने वातारण निर्मिती करण्यात आली.
16/12/2024 – समाजशास्त्र भाग 1 – मा. श्री. विलास चौधरी हिंदी -मनिष उघडे ,संस्कृत – मा. श्रीमती. शारदा उंबरकर,17/12/2024 – इंग्रजी – हरी माळी,भुगोल – अरुण चव्हाण
18/12/2024 – गणित भाग 2 – महेंद्र पाटील,विज्ञान भाग 1 – मा. सौ. पूजा शहा,19/12/2024 – मराठी – मा. श्री. किरण बडगुजर,विज्ञान भाग 2 – मा. सौ. रजनी सोनवणे,20/12/2024 – गणित भाग 1 – मोराणकर सर
शिबीर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. ध्वनी संयोजन मा. श्री. गोपाल बडगुजर यांनी यशस्वीरीत्या सांभाळले.