*धावत्या रेल्वेच्या धडकेने तरूणाचा मृत्यू ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन*
अमळनेर: धावत्या रेल्वेच्या इंजिनच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना पाडसे रेल्वस्थानकादरम्यान घडली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता सदर व्यक्ती जखमी अवस्थेत आढळल्याने सदर व्यक्तीस ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सदर व्यक्ती अनोळखी असल्याने ओळख पटण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.मयत व्यक्तीचे वर्णन उंची ५ इंच, वय- २८ ते ३०, शरीर बांदा सडपातळ, डोक्याचे केस काळे वाढलेले, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे अर्धवट उघडे, लांबट चेहरा तसेच अंगात काळे लांब बाईचे फुल शर्ट वर त्रिशूल व महादेवाचे चित्र बनियन नेस निस ब्लू रंगाची जीन्स पॅन्ट मळकट ओळखत असल्यास उपयुक्त माहिती लोहमार्ग पोलीस नंदुरबार ९८२३४०७१३२ तपास अंमलदार पोलीस नाईक हेमंत ठाकूर करीत आहे ओळख पटल्यास ९०९६९९५३९६ यांचे संपर्क साधाव.सदर व्यक्तीचे ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.