• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन

Feb 10, 2025

Loading

“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!”

(PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी – १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज (१० फेब्रुवारी) रोजी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना सादर करण्यात आले, PTA संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, शेखर कुळकर्णी, स्वर्णदीप राजपूत, आणि सुनिल पाटील यांसारखे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात मागील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे. गुणफुगवटा झाल्याच्या संदर्भात, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांनी अनुभवलेला अन्याय याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात सांगितले आहे की, परीक्षा हॉलमध्ये जर कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
PTA संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, परीक्षांमध्ये प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना हवी आणि कॉपीला आळा बसवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिकताबद्दल जागरूकता येण्याची अपेक्षा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed