• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई!

Mar 6, 2025

Loading

अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उद्घाटन करण्याची मोहीम अंमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांनी हाती घेतलेली असताना दोन दिवसापूर्वी अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील अवैध धंद्यावर साहेबांनी चांगलाच वचक बसविलेला असताना कारवाई करण्याचा सपाटा न थांबवता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारात एका जुगार हल्ल्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 5/3/2025 रोजी 18.50 वाजता परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की टाकरखेडा शिवारात एका शेतामध्ये पत्ता जुगारात खेळ चालू आहे. त्यावरून बारबोले साहेबांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार यांना साध्या वेशात सोबत घेऊन जुगार अड्ड्यावर रेड केले आहे.
छापा कारवाईदरम्यान 346960/- रुपये किमतीचा ऐवज त्यात 126960/- रुपये रोख, 5 मोटर सायकल व एक ऑटो रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे.
1) प्रकाश भगवान महाजन वय 36 वर्षे रा. मोठा माळी वाडा, धरणगांव
2) भाईदास सोनु अहिरे वय 59 वर्षे रा. लोणे ता. अमळनेर
3) रमेश आत्माराम महाजन वय 50 वर्षे हनुमान नगर, धरणगांव,
4) बापु जगन्नाथ पाटील वय 40 रा. शिवाजी नगर, पैलाड, अमळनेर
5) समाधान धर्मा पाटील वय 40 रा. टाकरखेडा ता. अमळनेर
6) शिवलाल धर्मा पाटील वय 36 वर्षे रा. टाकरखेडा ता अमळनेर
7) विजय पंढरीनाथ सोनवणे वय 43 वर्षे रा. निशाने ता. धरणगांव
8) शिवदास प्रकाश धनगर वय 37 वर्षे रा. नेहरू नगर, धरणगांव
9) धनंजय श्रीराम चव्हाण वय 33 वर्षे रा. बोरसे गल्ली अमळनेर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई मा. परीविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक श्री केदार बारबोले तसेच पोउपनि / नामदेव बोरकर, सफौ/1086 राजेंद्र कोठावदे, पोहेकाँ/1998 मिलिंद सोनार, पोकाँ/2826 विनोद संदानशिव, पोकाँ/1311 निलेश मोरे, पोकों/1541 उज्वलकुमार म्हसके, पोकाँ/1077 गणेश पाटील, पोका / 537 अमोल पाटील, पोकॉ/1254 सचिन पाटील, पोकाँ/686 राहुल पाटील, पोकाँ/1870 उदय बोरसे. अशांनी केलेली आहे. गुन्ह्याचा पोलीस तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाच्या कारवाई करण्यात येईल असे यावेळी माननीय बारबोले साहेबांनी आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *