श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम
श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे भजन व कीर्तनाचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) -श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने अधिक रंगत येणार आहे.
श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे दरवर्षी राम नवमीला तसेच इतर वेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात,यादिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होऊन रांगा लागत असतात,यावर्षी देखील मोठे नियोजन करण्यात आले। आहे.काल दिनांक 5 रोजी दुपारी 4 वाजेपासून मंदिर परिसरात जळगाव प्रस्तुत ओमकार संगीत साधना आयोजित करण्यात आली होती,असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला.
आज 6 रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे.तत्पूर्वी सकाळी 9.15 वाजता श्रीराम जन्मोत्सव कथा श्रध्येय राजीव कृष्णाजी झा महाराज यांच्या अमृत वाणीतून होणार आहे.तर दुपारी 4.15 वाजता भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई सह फुलांनी सजावट करण्यात आली आहे.काही भाविकांच्या वतीने भाविकांना प्रसाद व थंड पेय वाटप करण्यात येणार आहे.श्रीमंत प्रताप शेठजी यांचे पणतू चि. मिलिंद महेश अग्रवाल,मयंक महेश अग्रवाल व अग्रवाल परिवारातील सदस्य अमळनेर येथे दाखल झाले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यांना निस्वार्थ सेवेकरी जितेंद्र चौधरी,पुजारी सारंग कुळकर्णी, मंदिराचे कर्मचारी महेंद्र परदेशी,गणेश चौधरी,सत्यवान महाजन आदींचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान श्रीमंत प्रताप शेठजी यांनी निर्माण केलेले अमळनेर येथील श्रीराम मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान असुन काही वर्षांपासून प्रताप शेठजी यांच्या परिवाराने स्वतः लक्ष घातल्याने मंदिर परिसराचा विकास होऊन भाविकांचा ओघ वाढू लागला आहे.सदर परिवारा सोबतच अमळनेर परिसरातील दानशूर व्यक्ती व भाविकांनी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा श्रीराम भक्तांकडून व्यक्त होत आहे.स्वइच्छेने मदत व सेवा देण्यासाठी मिलिंद अग्रवाल,मोबा- 7875556589 यांच्याशी संपर्क साधावा.