“ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप”
जळगाव प्रतिनिधी
जळगांव शहरातील बी.यू.एन.रायसोनी विद्यालय आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.राजेश जाधव सर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योगा खेळाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती चंचल माळी मॅडम, जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षा तथा पी.के.गुळवे मुलींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.कांचन नारखेडे, सहज ध्यान योग केंद्राचे श्री.सचिन पिंगळे, श्री.अनिल रडे,श्री.दिनकर फेगडे यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर पाटील यांनी केले शालेय सुट्याचा उपयोग, बाहेरील तापमान व मोबाईल पासून दूर राहून व्यायामाच्या माध्यमातून शरीराच्या व मनाच्या बळकटीसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अश्या शिबिरांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन राज्य योगा क्रीडा मार्गदर्शक श्रीमती चंचल माळी यांनी आपल्या मनोगतातून केले. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष शिरीषभाऊ रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या.
दिनांक ११ एप्रिल ते ३० एप्रिल या वीस दिवसीय क्रीडा शिबिरात उत्तेजीत व्यायाम प्रकार, पूरक खेळ, सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार, तालबद्ध व्यायाम प्रकार, पारंपरिक खेळ, देशी खेळ, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, कराटे, मल्लखांब, रोप मल्लखांब, ॲथेलेटिक्स, डॉजबॉल, क्रिकेट, फुटबॉल या खेळाचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिर प्रमुख श्री.योगेश सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन श्री विश्वासराव जाधव यांनी केले याप्रसंगी शिबिरार्थी पूर्वी सटाले व पूर्व तावळे यांनी शिबिरा विषयी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिबिरार्थीनी मल्लखांब व रोप मल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले शिबिरार्थिंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले याप्रसंगी प्रशिक्षक धनराज भोई दिव्या सोनार प्रणव गडे आकाश पाटील शिबिरार्थी त्यांचे पालक यांची उपस्थिती होती.