“माधवराव नानासाहेब पाटील यांचे सेवापुर्तीसम्मान: चोपडा शाखेत भावपूर्ण निरोप”
अमळनेर प्रतिनिधी
ग. स. सोसायटी जळगांव अंतर्गत चोपडा शाखा क्र.1शाखाधिकारी मा. नानासाहेब माधवराव हिंमतराव पाटील यांना वयोमानाने नियमानुसार सेवापुर्ती झाल्याने आज त्यांना संस्थेच्या वतीने सहपरिवार निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे माजी संचालक व सहकार गटाचे श्रेष्ठी तात्यासाहेब रमेश शिंदे यांनी स्विकारले. तर शिक्षक नेते भाऊसाहेब आर. एच. बाविस्कर सर,संचालक दादासाहेब श्री मंगेश भोईटे सर,संचालक दादासाहेब श्री योगेश सनेर सर, संचालक भाऊसाहेब एकनाथ पाटील सर,मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे सर,पारोळा संचालक दिपक पाटील व माधवराव नानांचे नातेवाईक आप्तेष्ठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
माधवराव नानांचे जीवन पैलू अर्थात जीवन प्रवास विषयी यावेळी मान्यवरांनी माहिती सांगितली. माधवराव नानांचा ग. स. संस्थेविषयी प्रामाणिकपणा,निष्ठा याबद्दल उहापोह झाला. त्यावेळी स्व. बी. बी आबांची देखील आठवण सगळ्यांना झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा सर्व शाखेचे शाखाधिकारी, उपशाखाधिकारी, रोखपाल,लिपिक, शिपाई यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वल शिंदे (बंटी दादा ) यांनी तर आभार उपशाखाधिकारी प्रविण सत्तेसा यांनी मानले.