खान्देश प्रवासी असोसिएशन, यांचे वतीने धरणगावातील गुणवंताचा गुणगौरव !…  ” १० वी” ” १२ वी” तील “गुणवंत” विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान !..
1 min read

खान्देश प्रवासी असोसिएशन, यांचे वतीने धरणगावातील गुणवंताचा गुणगौरव !… ” १० वी” ” १२ वी” तील “गुणवंत” विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान !..

Loading

खान्देश प्रवासी असोसिएशन, यांचे वतीने धरणगावातील गुणवंताचा गुणगौरव !…

” १० वी” ” १२ वी” तील “गुणवंत” विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान !..

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – दि. १ जुन रविवार रोजी खान्देश प्रवासी असोसिएशन,धरणगाव यांचे वतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी, प्रोत्साहन मिळावे,मनोबल वाढावे या उद्देशाने धरणगावातील सर्व शाळा महाविद्यालयातील, १०वी व १२ वी, कला, वाणिज्य, विज्ञान, शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या एकूण ५७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर हॉल, धरणगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष- बापूसो प्रा आर एन महाजन सर हे होते, तर प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर मा.श्री भगवान भाऊ महाजन व धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी एस आय मा श्री संतोष पवार साहेब हे उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले..
प्रा.आर एन महाजन सर यांनी विद्यार्थ्यांप्रती पालकांची जबाबदारी विद्यार्थ्यांचे मनोबल कसे वाढवावे, याविषयी उदाहरणासह विस्तृत मार्गदर्शन केले मा.श्री.भगवानभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्यांनी पालकांच्या दबावात नाही तर आपापल्या क्षमतेनुसार आपले क्षेत्र निवडावे असे मार्गदर्शन केले, उच्च शिक्षण घेतल्यानंतर परदेशात न जाता आपल्या देशातच राहून आपल्या गावाचे नाव उंचवावे अशी आशा व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
पी.एस.आय मा.श्री संतोष पवार साहेब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयाची पूर्व तयारी, शिक्षकांची(गुरु) विद्यार्थी घडवण्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका व करियर ऑपॉर्च्युनिटी, या विषयी मार्गदर्शन केले.उपस्थित पालक व विद्यार्थी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या वतीने कु. अनुष्का बडगुजर, कु.प्रांजल भावसार व विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या वतीने प रा विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मा.जी आर सूर्यवंशी सर, पालक -मा.श्री सचिन भावसार सर,साळवे येथील जेष्ठ शिक्षक श्री सुधाकर मोरे सर, तसेच सर्व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत खान्देश प्रवासी असोसिएशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रतीक जैन केले, प्रास्ताविक ऍड नंदन पाटील केले व आभार संस्थेचे अध्यक्ष श्री कमलेश तिवारी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी खान्देश प्रवासी असोसिएशनचे,अध्यक्ष- कमलेश तिवारी, उपाध्यक्ष- चंद्रकांत भावसार, सचिव- श्रेयांस जैन सहसचिव -ऍड नंदन पाटील खजिनदार- प्रतीक जैन व
संस्थेचे मार्गदर्शक सदस्य श्री. दिनेश पाटील, श्री. युवराज रायपूरकर, श्री प्रशांत भाटिया, श्री नारायण महाजन, श्री. रावसाहेब पाटील, श्री.जतीन नगरिया यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *