• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान: टाकरखेडा तालुक्यात शेकडो नागरिकांना शासन सेवा प्रत्यक्ष उपलब्ध”

Jun 12, 2025

Loading

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान: टाकरखेडा तालुक्यात शेकडो नागरिकांना शासन सेवा प्रत्यक्ष उपलब्ध”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालयाकडून दि. 25 मार्च 2025 रोजी घेतलेल्या शासननिर्णयानुसार, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गतिमान प्रशासन तसेच आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले.

टाकरखेडा मंडळातील टाकरखेडा, पळासदळे, कुन्हे खु., म्हसले, निमझरी या गावांतील नागरिकांसाठी दि. 12 जून 2025 (शुक्रवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, टाकरखेडा (ता. अमळनेर) येथे हा शिबीर मोठ्या उत्साहाने पार पडला. या शिबीरास मा. जि.प. सदस्य ताईसो. जयश्रीताई अनिल पाटील यांनी आपली उपस्थिती दाखवली. तसेच, टाकरखेडा मंडळातील सर्व गावांच्या सरपंचांनी देखील उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शिबिरात तहसिलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले, तसेच तालुका पातळीवरील शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपापले स्टॉल लावून विविध शासन योजना व सेवा प्रदान केल्या. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच सामान्य नागरिकांची तक्रारी व समस्या तत्परतेने सोडवण्यात आल्या.

शिबीरात खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सेवांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला:

– 23 नवीन व दुबार शिधापत्रिका वितरण (संगायो शाखा, तहसिल कार्यालय अमळनेर)
– 1 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप
– 233 डीबीटी (डिजिटल बँक ट्रान्सफर) प्रक्रिया पूर्ण
– 11 नवीन लाभार्थ्यांचे अर्ज नोंदणी व स्वीकारले गेले
– 47 उत्पन्न दाखले वितरण
– 21 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण
– 21 रहिवासी प्रमाणपत्र वितरण
– 13 जाती दाखले वितरण
– 31 आधार नोंदणी
– 221 आधार दुरुस्ती
– महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 3 जलतारा प्रशासकीय मान्यता
– पंचायत समिती अमळनेरच्या माध्यमातून विविध शासकीय सुविधा देण्यात आल्या

या शिबीराला अंदाजे 400-450 नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे अभियानाला दमदार प्रतिसाद मिळाला. निवडणूक नायब तहसिलदार श्री. प्रशांत धमके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व असा शिबीर पुढेही नियमीतपणे होऊन प्रशासन आणि जनता यांच्यात संवाद अधिक दृढ करण्याचे आश्वासन दिले.
टाकरखेडा तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित या शिबीरमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गावगुंतातील नागरिकांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित झाले असून, प्रशासनाच्या कार्यक्षमता व जनसंपर्कात गुणात्मक वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed