ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन,बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद -जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.
1 min read

ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन,बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद -जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.

Loading

*ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन*

*बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे:;जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.*

ठाणे:कल्याण
(मनिलाल शिंपी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे व बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने बी . के.बिर्ला महाविद्यालयामध्ये ऑलिंपिक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांचा अध्यक्षतेखाली बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा अध्यक्ष अनिल तिवारी, बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ यज्ञेश्वर बारगाव, ठाणे जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक समीर सूर्यवंशी, एम.एल.म्हात्रे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑलिंपिक दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी मेजर ध्यानचंद व ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिना निमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये क्रीडा विषयक प्रश्न मंजूषा, फूटबॉल व हॅंडबॉल खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धांकरीता कल्याण शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. सुवर्णा बारटक्के यांनी उपस्थित खेळाडूंना खेळामध्ये अधिकाधिक मेहनत घेऊन नावलौकिक उंचवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहण्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. व बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. अशा शब्दात जंपरोप खेळाचे प्रशिक्षक अमन वर्मा यांच्या सत्कार करत खेळाडूंचे अभिनंदन केले.
बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडू कावासाकी जपान, येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी जंपरोप या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे मन प्रसन्न केले.बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा अध्यक्ष अनिल तिवारी यांनी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्ण यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवर, विविध शाळा महाविद्यालयांमधील क्रीडा शिक्षक,क्रीडा प्रशिक्षक, व खेळाडूं यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री.समीर सूर्यवंशी, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक (शिक्षण ) डॉ.नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे चेअरमन श्री.अनिल तिवारी, बी.के. बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.यज्ञेश्वर बागराव, क्रीडा शिक्षक प्रा.राकेश ठाकरे, प्रा.अक्षय टेंभे, प्रा.शुभम मोहोपे, एम.एल. म्हात्रे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक,तसेच आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी. के. बिर्ला कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक चिंतामण पाटील यांनी केले. डॉ. यज्ञेश्वर पारगाव यांनी उपस्थित मान्यवर खेळाडू प्रशिक्षक बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *