
आर एस पी नागपूर संघटनेचे कार्य विश्वासदर्शक आहे.* महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे: पी एस.महाजन.
*आर एस पी नागपूर संघटनेचे कार्य विश्वासदर्शक आहे.*
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे:
पी एस.महाजन.
नागपूर( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे: कोल्हापूर संघटनेने रजिस्ट्रेशन केले आहे. माहितीनुसार कोल्हापूर संघटनेला एफ सर्टिफिकेट मिळाले नाही.शिक्षण विभाग,पोलिस विभागाची कोणतीही परवानगी नसताना सत्र शुभारंभ मिटींग होत आहे. कोल्हापूर संघटनेचे प्रवेश सत्र सभेचे परिपत्रक काढण्या अगोदर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांनी संबंधित ऑर्गनायझन ची संपूर्ण माहिती मागवणे आवश्यक होते. व संबंधित संघटनेला कोणत्याही प्रकारची पोलीस विभागाची किंवा शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता नाही या गोष्टी माहित करून घेणे गरजेचे आहे..तसेच
न्यास कोल्हापूर येथे कोर्टात केस सूरू आहे.
कोल्हापूर संघटनेचा महासमादेशक याने काय प्रताप केला आहे.शिक्षक नावाला काळीमा फासला आहे. आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीचा प्रकरणात तुरुंगात आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. अशा खोट्या,लबाड,आणि विश्र्वासघातकी कलंकित लोकांमुळे
आर.एस पी चे नाव बदनाम होत आहे.प्रशासकीय अधिकारी,पोलिस अधिकारी, तसेच राजकीय गटातून देखील
आर.एस पी कडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला आहे.हे सर्व लक्षात घेऊन 50 वर्षापूर्वी एकमेव आर.एस पी नागपूर संघटनेत रहाव की ज्यांचा जन्म सप्टेंबर 2023 मधे झाला. त्यांच्या कडे रहाव हे ठरवावे.
कोल्हापूर आर.एस पी ची निर्मिती होऊन एक वर्ष होत नाही तो लगेच पोलिस विभागाने परवानगी नाकारल्यावर देखील अनधिकृत राज्य प्रशिक्षण घेतले.
आपल्याला नागपूर मुख्यालयाच 1975 या वर्षाचा पत्राचा आधार घेऊन खर्चास मान्यता आहे . अस पत्र देऊन भूलथापा देतात .ते पत्र नागपूर करता आहे. कोल्हापूर आर.एस पी करता नाही.
कोल्हापूर बोर्डाने P5 हा कोड क्रमांक केव्हा दिला हे स्पष्ट करावे.
कोल्हापूर आर.एस पी 2023 ला निर्माण झाली.मग या संघटनेचा अभ्यासक्रम केव्हा पूर्ण केला, व पुणे शिक्षण विभाग यांनी कधी मान्य केला. हे स्पष्ट करावे.
कोल्हापूर ला नाव न घेता एक व्यक्ती अभ्यासक्रमाचे खाजगी पुस्तक छापून विक्री करण्याच काम करीत आहे.
या अगोदर पहिला म्होरक्या सर्वांनाच माहित आहे.त्याने कोणत्याही प्रकारे धर्मदाय ऑफिस मध्ये बँक स्टेटमेंटची नोंद केली नव्हती,महाराष्ट्रातील कितीतरी शिक्षकांना व शाळांना त्याने आर एस पी पथक नोंदणीचा नांवाने फी जमा करून स्वतःचा खिश्यात घातली आहे.ठाण्याचा प्रशिक्षणाचे नावाखाली दीड लाख रुपये घेऊन नाकबूल होत आहे.विद्यार्थ्यांचे नोंदणीचे तर लाखो रुपये दरवर्षी हडप करत होता.तसेच एका प्रकाशनाला हाताशी धरून स्वतःला लेखक म्हणून पुस्तक छापून प्रशिक्षण असेल तेथे प्रकाशन चे कर्मचारी यांचे मार्फत एक काॅपी म्हणून फ्रि देतात व विद्यार्थ्यांना बूक स्टोअर चा पत्ता देऊन खरेदीला भाग पाडतात.
बरेच गैरप्रकार झालेले आहे.
म्हणून सर्वानी खरी आर.एस पी कोणतीआहे व आपण कोठे रहावे याचा प्रत्येकानी योग्य विचार करून. पूढील कार्य करावे हेच कळकळीचे सांगणे आहे.
आर.एस पी चा सर्वे सर्वा म्हणणारा अहिल्यानगर च्या शिक्षक वर्गाला अजून ही चुकीचे मार्गदर्शन करून संपर्कात आहे. आर.एस पी तोडण्याचे पाप सुरूच आहे.
त्याचे छापलेले पुस्तक अहिल्यानगर येथे वाटप करू दिले नाही.
बरच काही सांगण्या सारख आहे.आर एस पी ला कलंक लागला आहे. आणखी कलंक लावू नका.असे आव्हान महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन चे उपाध्यक्ष पी एस महाजन यांच्याकडून करण्यात आले आहे.